‘उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान्निबोधत’, क्षुरस्यधारा निशिता दुरत्यता दुर्ग पथस्थत्कवयो वदन्ती!

‘यही जज्बा रहा तो मुश्किलो का हल भी निकलेगा, जंमी बंजर हुवी तो क्या वही से जल भी निकलेगा, नाहो मायुस ना घबरा अंधेरोसे मेरे साथी इन्ही रातो के दामन से सुनहरा कल ही निकलेगा!
किंवा
सुधारणावादी कवी जावेद अख्तर यांनी म्हटले आहे तसे,
दिल ना उम्मीद तो नहीं, नाकाम ही तो है लम्बी है गम की शाम, मगर शाम ही तो है.
ये सफ़र बहुत है कठिन मगर ना उदास हो मेरे हमसफ़र;
ये सितम की रात है ढलने को है अन्धेरा गम का पिघलने को
ज़रा देर इस में लगे अगर, ना उदास …
नहीं रहनेवाली ये मुश्किलें ये हैं अगले मोड़ पे मंज़िलें
मेरी बात का तू यकीन कर, ना उदास …
कभी ढूँढ लेगा ये कारवां वो नई ज़मीन नया आसमान
जिसे ढूँढती है तेरी नजर, ना उदास …

मित्रांनो, जीवनाच्या स्पर्धेत हिमतीने, अजिंक्य राहिल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन! साधारणपणे सन २०१९च्या शेवटच्या दोन महिन्यात चीन मध्ये वुहान या शहरात कोविड-१९ या विषाणूने धुमाकूळ घातल्याच्या बातम्या आल्या. त्यावेळी हा विषाणु जगभरात थैमान घालणार आहे याची सुतराम कल्पना नसलेल्या जगभरातील बहुतांश देशात आज सन २०२०च्या अखेरच्या दोन महिन्यात फार विदिर्ण स्थिती निर्माण झाली आहे. कारण आपण सारे गाफिल राहिलो. लाखो लोकांचा जीव घेणा-या या विषाणुच्या संसर्गाने लाखो रुग्ण आजही ग्रस्त आहे. संक्रमण थांबविण्यासाठी टाळेबंदीसारख्या आततायी उपाय योजना रामबाण उपाय नाहीत या भ्रमातून आपण बाहेर आलो आहोत. सारे जग पुन्हा सावरण्याच्या प्रयत्नात आहे. या सा-यातून निर्माण झालेल्या नकारात्मक भावना आणि वातावरणातून स्वत:ला सावरणे ही प्राथमिकता आहे.

याचे कारण जगात कोरोना सारख्या आपत्ती काही पहिल्यांदाच आलेल्या नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे मनातील भिती काढून टाकून सावध रहायला शिकले पाहीजे हा धडा आपल्याला या साथ संक्रमणाने दिला आहे. आणि महत्वाचे म्हणजे जगात सर्वाधिक बरे होणा-या रुग्ण संख्येत आपण अमेरिके सारख्या अतिप्रगत देशालाही मागे टाकले आहे. डोनाल्ड ट्रम्पसह अनेक महत्वाच्या देशांच्या प्रमुखांना भारताकडे हायड्रोक्लोरोक्विन मागावे लागले.आणि उद्या लसीकरणाच्या प्रक्रीयेतही आपला देशआणि महाराष्ट्र सा-या जगाचे नेतृत्व करत आहे, त्यामुळे हे संकट काही सारे वाईट होण्यासाठीच आलेले नाही! हे सर्वप्रथम जाणून घेवूया! महेंद्र कपूर यांनी गायलेल्या या ओळी पहा, ‘कळण्यासाठी मोल सुखाचे तुला विधीने दु:ख दिले, दु:खामधून निज सौख्याची फुलवित जा तू गोड फुले!’ किंवा कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्यसंग्रमात क्रांतीचा जयजयकार करताना म्हटले तसे ‘कश्यास आई भिजवसी डोळे उजळ तुझे भाळ रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल!’

या बाबतीत ओशो(आचार्य रजनिश) या सत्तरच्या दशकात होवून गेलेल्या  दार्शनिक, विचारवंताचे विचार नक्कीच सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहेत. आज जसे आपण कोरोनामुळे हादरलो आहोत तसे ७०च्या दशकात हैजा महामारी विश्वभर पसरली होती. त्यावेळी अमेरिकेत ओशो रजनीशजी यांना या महामारी पासून जगाचा बचाव कसा होईल? असा प्रश्न विचारण्यात आला. ओशो यांचे त्यावेळी दिलेले सविस्तर उत्तर आज जवळपास पन्नास वर्षानी देखील कोरोना स्थितीला समर्पक असेच आहे. ज्याचे अनुसरण करता येईल.
प्रश्नकर्त्याला ओशौ म्हणाले, खरेतर आपण हा प्रश्न विचारता आहात तोच चुकीचा आहे? हा प्रश्न असा असायला हवा होता की, महामारीबद्दल माझ्या मनात मरणाचे जे भय निर्माण झाले आहे त्याबद्दल काही सांगा.! या भिती, नकारत्मकतेपासून बचाव कसा करता येईल? कारण या विषाणु पासून बचाव करणे तर अगदी सहज सोपे आहे. पंरतु जी भिती तुमच्या आणि जगभरातल्या अगणित लोकांच्या मनात निर्माण झाली आहे तिच्या पासून बचाव करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या महामारीने कमी आणि भितीच्या महामारीने जास्त लोक मरत आहेत. अनामिक भिती, नकारात्मकतेपेक्षा भयावह या जगात कोणताही विषाणु नाही. ही भिती काय आहे? समजून घ्या! अन्यथा अंतर्मनातल्या या भितीने तुम्ही जिवंतपणीच प्रेतवत होवून राहाल! हे जे भयप्रद नकारात्मक वातावरण तुम्ही सभोवताली पहात आहात याचे त्या विषाणु वगैरेशी काही देणे घेणे नाही. असे काही पहिल्यांदाच होत नाही, यापूर्वी हजारोवेळा होवून गेले आहे. आणि या नंतरही होत राहणार आहे. आणि आपण याचा अनुभव घेवू की येत्या काळात युध्द तोफा, दारूगोळा अणुबॉम्बने नाही तर जैविक हत्यारांनी लढली जातील!

ओशो म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक समस्या मूर्खांसाठी भितीदायक असते पण ज्ञानी लोक त्यातही संधी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि सावरतात!
या महामारीत तुम्ही घरात बसले आहात, तर व्यर्थ चिंता सोडा, पुस्तके वाचा, शाररिक कष्ट करा, व्यायाम करा, सिनेमा पहा,योग करा आणि महिनाभरात १५ किलो वजन कमी करा. चेह-यावर लहान मुलांसारखे निरागस तेज आणा! आपल्या आवडत्या छंदासाठी हा वेळ सत्कारणी लावा! ओशो म्हणाले की मला जर १५ दिवस घरात बसून राहा सांगितले तर मी १५ दिवसांत ३०पुस्तकांचा फडशा पाडेन. आणि ती मिळाली नाहीत तर स्वत:च एक छान पुस्तक लिहून टाकेन! हा महामारीत जे हुशार चतुर आहेत त्यांनी पैसा गुंतवणूक केली आहे. कारण पुन्हा वीस तीस वर्षात अशी संधी येणार नाही! आहे की नाही संकटाला संधीत बदलण्याचा प्रभावी मार्ग!

मरणाची भिती ही केवळ सामुहिक मुर्खपणा आहे जो माध्यमातून टिव्ही बातम्यांमधून गर्दीला विकला जात आह. ओशो म्हणाले, दूरचित्रवाणी, वृत्तपत्र वाचणे बंद करा. आणि मित्रानो सर्वत्र करोना रूग्णांईतांना डॉक्टरही हाच सल्ला देत आहेत! आहे की नाही गंमत! अशी कोणतीही चित्रफित बातमी व्यक्ती तुमच्यापासून दूर ठेवा जिच्याकडून तुमच्या मनात भितीला चालना मिळू शकते! महामारीबाबत चर्चा करणे बंद करा!  भिती हे देखील वेगळ्या प्रकारे सामुहिक आत्मसंमोहनच असते! तेच तेच पुन्हा पुन्हा वाचून पाहून शरीरात जैव रासायनिक क्रिया सुरू होतात. काही वेळा हे रासायनिक बदल इतके जीवघेणे असतात की त्यातून मृत्य़ू होवू शकतात. या जगात महामारीमुळे सारे बंद झाले पण निसर्गाचे, पर्यावरणाचे संरक्षण झाले आहे. या जगात त्याशिवाय देखील खूप काही गोष्टी चांगल्या सकारात्मक होताना दिसत आहेत. जसे बाबुजीं पाडगावकरांच्या गाण्यात म्हणतात, ‘झाड फुलांनी आले डवरून तू न पाहसी डोळे उघडून, वर्षाकाळी पाऊसधारा तुला न दिसला त्यात पिसारा’

ओशो पुढे सांगतात, ध्यान साधना करा त्यातून तुमच्या रक्षणासाठी संरक्षण कवच तयार झाल्याचा अनुभव मिळतो. या विश्वाची निर्मिती म्हणून तुम्ही सुध्दा एक घटक आहात. तुमच्या रक्षणाची जबाबदारीही त्या निर्मात्याची आहे हे जाणिव करून घ्या! त्यासाठी सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार टाळा! कारण बाहेरचे वातावरण नकारात्मकतेवर सुरू आहे. खरेतर हे जैविक युध्द सुरू आहे. जगातल्या महाशक्तींमध्ये ते वर्चस्व आणि विस्तारवादासाठी सुरू आहे त्याची झळ सुक्या सोबत ओल्याला लागत आहे त्यात तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता! ध्यान साधना यावर उत्तम मार्ग आहे. शून्यत्वाच्या कृष्णविवरात विचरण करा आणि म्हणा अहं ब्रम्हास्मी हे जग मीच आहे! नवे शास्त्र शिका. संत सज्जनाच्या सहवासात राहा. विव्दवतजनांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या! आहारवर लक्ष द्या, शुध्द पाणी, गरम पाणी प्या! आणि शेवटचे  आत्मसंयम ठेवा लवकरच स्थिती बदलणार आहे आणि सारे काही मंगल छानच होणार आहे हे पक्के मनात ठसवून घ्या! जोवर मरण येत नाही तोवर घाबरायचे कारणच नाही कारण ते तर अपरिहार्य आहे कधीतर येणारच आहे त्याला घाबरून काहीच बदलणार नाही हे लक्षात ठेवा! कारण भिती हा मुर्खपणा आहे! समजा या महामारीत मेला नाहीत तर काय अमर झालात का? कधीतरी मरण येणारच ना!? त्यावेळी महामारी नसेल तरी तो दिवस सर्वाना एक दिवस येतोच म्हणून ज्ञानी होवून जगा आहे ते क्षण अधिक चांगले जगण्याचा प्रयत्न करा. गर्दीचा भाग होवून घाबरून जावू नका असे ओशो सांगतात.

आता तर संसर्गासाठी आपण घरात बसलो त्या गोष्टीत कसा राम नाही हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी हा दावा करून शोधून काढले आहे. संशोधनात सहभागी असलेल्या प्राध्यापक मोनिका गांधी यांनी म्हटले की, दरवाज्यासारख्या पृष्ठभागावरून कोरोना विषाणु फैलावणार नाही. एखाद्या व्यक्तीला संसर्गबाधित करतील एवढी क्षमता पृष्ठभागावर असलेल्या विषाणूमध्ये नाही, असे त्यांनी म्हटले. मात्र प्रतिबंधक उपाय म्हणून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हात धुणे आणि चेहऱ्याला हात न लावणे यासह सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर करणे हे प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. प्रा. मोनिका गांधी यांनी सांगितले की, जगभरातील अनेक ठिकाणी पृष्ठभागावर सातत्याने जीवाणू विरोधी औषधे, सॅनिटायझरचा मारा करण्यात येतो. आता या नव्या संशोधनामुळे ही बाब अनावश्यक होऊ शकते. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दरवाजे, बटणे, लिफ्ट, जीने आदी ठिकाणी सातत्याने सॅनिटाइझ केली जातात.प्रा. गांधी यांनी विज्ञानविषयक वेबसाइट नउटिलुस सोबत बोलताना सांगितले की, करोना विषाणूची बाधा पृष्ठभागावरील विषाणूमुळे होत नाही. या महासाथीच्या आजाराच्या सुरुवातीला पदार्थांद्वारेही संसर्ग फैलावत असल्याची भीती लोकांमध्ये होती. करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात येणे अथवा करोनाबाधित व्यक्तीला असलेल्या सर्दीमुळे बाधा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर, विज्ञानविषयक नियतकालिक असलेल्या ‘द लासेन्ट’ने म्हटले की, पृष्ठभागी करोनाचा विषाणू असल्यास त्याच्या संसर्गाचा धोका अतिशय कमी असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच संसर्ग होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जगभरात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. जवळपास १० लाखांहून अधिकजणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक बाधित असून ७६ लाखांहून अधिकजणांना संसर्ग झाला आहे. तर, दोन लाखांहून अधिकजणांचा मृ्त्यू झाला आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या ६६ लाखांहून अधिक झाली असून एक लाखांहून अधिकजणांना प्राण गमवावे लागले आहेत. आहे की, नाही महत्वाचे!?

हा विषाणू प्रथम चीनमध्ये सापडला, तेव्हा जगभरात राष्ट्रीय आणि आर्थिक संकुचितपणा टिपेला पोहोचला होता. ‘संपूर्ण जग एक खेडेगाव आहे’, या संकल्पनेला जणू काही सुरूंग लागला होता. आज या विषाणूने जग बंद करून टाकले असताना, याच जागतिक अगतिकतेच्या मुद्द्याला ‘द न्यू वर्ल्ड डिसऑर्डर अँड द इंडियन इम्पेरिटिव्ह’, या पुस्तकात हात घालण्यात आला आहे. प्राध्यापक श्रीधर वेंकटपुरम यांनीही या पुस्तकाने अचूक वेळ साधल्याचे म्हटले आहे. या पुस्तकामध्ये केवळ वरवर दिसणाऱ्या मुद्द्यांवर न बोलता, हे मुद्दे ज्या माध्यमांतून जगापुढे आणले जातात, त्यांची अंमलबजावणी केली जाते आणि योग्य वेळी हे मुद्दे संपविलेही जातात त्या संपूर्ण व्यवस्थेवर भाष्य केले आहे. या पुस्तकात नोंदविलेल्या अनेक जागतिक समस्यांपैकी दोन समस्या सध्याच्या जागतिक महामारीच्या पेचप्रसंगांशी संबंधित आहेत. त्यातील एक म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थांची विश्वासार्हता. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी जाहीर करायला खूपच उशीर लावला. त्यातही त्यांनी चीनच्या अधिकृत दाव्याचा आधार घेतला. यातच खरी मेख आहे. आपल्या अनेक जागतिक संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधी संस्थांची गोची झालेली आहे.

या संस्थांमधील राजकारण, तिथे होत असणारे गैरव्यववहार, सुयोग्य प्रतिनिधित्वाची वानवा, स्वतंत्र नेतृत्वाचा अभाव आणि उद्दिष्टांबद्दल अस्पष्टता यामुळे या संस्था अडचणीमध्ये असतात. दुसरी समस्या म्हणजे, सध्या समस्त जगाला भेडसावणा-या राष्ट्रवादाचा अतिरेक. सर्वच देशात ‘फक्त माझा देश’ ही भावना वाढीस लागली असून, त्यातून अनेक प्रश्न जन्माला येणार आहेत. सध्याच्या स्थितीत संपूर्ण जगातील वृत्तपत्रांचे ठळक मथळे या दोन्हीही समस्यांच्या विविध दाखल्यांनी  झळकत आहेत. तरीही ‘अमेरिका प्रथम’ असा नारा देत सत्तेवर आलेल्या ट्रम्प प्रशासनाने आपले खरे दात दाखवलेच. कोरोनावर गुणकारी लस फक्त अमेरिकी लोकांनाच मिळावी, यासाठी ट्रम्प प्रशासनाने जर्मनीला गळ घातली. चीनकडून औषधनिर्माणाची उत्पादने आयात करण्याचा मनसुबा त्यांनी रद्द केला. तसेच जी-७ परिषदेत कोरोनाला ‘वुहान विषाणू’ असे हेतूपुरस्सररित्या संबोधत आंतरराष्ट्रीय समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. कोरोनाशी सामना करण्याच्या जागतिक प्रयत्नांत खोडा घालण्याचा हा प्रयत्न ट्रम्प प्रशासनाकडून झाला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही अमेरिकेचे हे असे खोडसाळ प्रयत्न सुरूच आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर पसरवणा-या चीनने सुरुवातीला कोरोना विषाणूसंदर्भात मूग गिळणेच पसंत केले. चीनमध्ये जेव्हा कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती, तेव्हा अत्यंत थंडपणाने चीन सरकारने या आपत्तीला प्रतिसाद दिला. तसेच आपल्याकडे असा काही विषाणू झपाट्याने पसरतो आहे, ही माहितीही चीनने जगापासून लपवून ठेवली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय या आजारापासून अनभिज्ञ राहिला. आता चीन जगाला आपण कोरोनामुक्त करू, असा आव आणत इटलीला वैद्यकीय मदतीचा हात देत आहे. ज्या ज्या देशांना चीन मदत करू इच्छितो ते ते देश नजीकच्या भविष्यात चीनचे मिंधे होतील. जेव्हा चीनविरोधात कोरोनावरून रणकंदन माजविण्याची वेळ येईल, तेव्हा हे सर्व देश चीनविरोधात एक शब्दही उच्चारणार नाहीत. युरोपला सर्वात जास्त कोरोनाचा फटका बसला आहे. सर्वार्थाने प्रगत असलेल्या युरोपीय देशांच्या समूहातील सदस्यांना या परिस्थितीतून सावरायला परस्परांना मदत करण्याएवढाही वेळ मिळत नाही आहे यालाच जैविक युध्द म्हणतात. आणि ते सध्या जगात सुरू आहे, हे समजून घ्यायचे की भितीने आपल्या मनाची कवाडे बंद करून कुढत बसायचे? पंतप्रधान मोदी यांनी म्हणूनच आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे, जसे स्वामी विवेकानंदानी कठोपनिषीदातील हा मंत्र दिला, ‘उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान्निबोधत’,क्षुरस्यधारा निशिता दुरत्यता दुर्ग पथस्थत्कवयो वदन्ती! जसे आत्मग्लानीतील अजुर्नाला भगवान श्रीकृष्णाने कर्म सिंध्दात सांगून त्याचे आत्मभान जागविले! म्हणून कोरोनासंकट ही एक इष्टापत्ती समजली जायला हवी. ज्यातून आपल्या जागतिक समुदायाची परस्परावलंबित्वाची गरज, एखाद्या समस्येला धीराने तोंड देण्यासाठी लागणारे सामर्थ्य वाढीस लागले पाहिजे.

जगाला आपल्या मरणमिठी मारणारा कोरोना विषाणू हा काही या भूतलावरचा पहिलाच विषाणू  आणि शेवटचाही नाही.  त्यामुळे व्यक्ति, समाज आणि नंतर देश अश्या तीनही बाजूने आपण सक्षमपणे विचार केला पाहीजे. सध्या संकटाला संधी समजून काही लोकांनी लुटमार सुरू केल्याचे जे चित्र दिसत आहे त्यात आपल्याच सामान्य जनतेचे हाल होताना दिसत आहेत. त्यात राज्य सरकारने लक्ष घातले आहे तरी देखील काही विघ्न संतुष्ट लोक या संधीत हात धुवून घेत आहेत. त्यांना जागृतपणे रोखणारे सेवाभावी कार्यकर्ते जास्तीत जास्त तयार झाले पाहीजेत हे आपणच करू शकतो. ‘द इंडियन इम्पेरिटिव्ह’, या पुस्तकात येत्या दशकांमध्ये शक्यता काय असतील, याची झलक कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या निमित्ताने दाखवून दिली आहे. पहिली प्राथमिकता म्हणजे लोकांना समान संधी उपलब्ध करून देणे. भारतात नोंदणी नसलेल्या मजुरांची, कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच गरीबवर्गाला कोरोनाची सर्वाधिक झळ सोसावी लागत आहे. त्याचा अंतिम परिणाम सार्वत्रिक अर्थव्यवस्थेवर होत आहे.

ज्या व्यवसायांना सुरक्षाकवच नाही, ज्यात पैसे कमी मिळतात, अशांना सुरक्षेची हमी हवी.  त्यामुळे आशा आहे की, या संकटाच्या काळातही या अनेक वर्षे जुनाट असलेल्या सामाजिक-आर्थिक असमानता नष्ट करण्याची संधी भारत सरकार आणि जनतेला कळेल. यातून आम्हाला आणखी एक अनिवार्यता समजली. ती अशी की, भारताच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला देशांतर्गत अनुभव आणि धोरणात्मक धड्यांवरून आकार दिला गेला पाहिजे. जागतिक महामारीने विकसनशील अर्थव्यवस्थांपुढे मोठ्या प्रमाणात आव्हाने निर्माण केली आहेत. त्यांना प्रतिसाद देऊन आपले महत्त्व वाढवून घेण्याची सुवर्णसंधी भारताला प्राप्त झाली आहे. अमेरिकेकडे असलेल्या सामर्थ्याचे गुपित तिच्या लष्करी तसेच राजनैतिक युत्या आणि आर्थिक संस्था यांच्या भूराजकीय जाळ्यात दडलेले आहे. त्याचवेळी चीनचा उदय मात्र त्याच्या भू-आर्थिक शक्तीमुळे आणि पुरवठा साखळ्या आणि व्यापार यांच्यावरील नियंत्रण यामुळे झाला आहे.

या संकटाला तोंड देऊन भारत जगातिक विकसित अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येऊ शकतो. कारण आशिया आणि आफ्रिकेतील लक्षावधी लोकांना सुशासनाचा रस्ता दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. जागतिक सहकार्याच्या नैतिक पुनर्निर्माणाची जबाबदारीही भारतावर आहे. जग हे एका विशेष व्यवस्थेच्या प्रभावामध्ये घसरत चाललेले आहे. त्यामुळे या जागतिक आव्हानांना परिणामकारकरित्या तोंड देण्याच्या आपल्या क्षमतांवरही आज मर्यादा आहेत. कोरोनाचे सावट भारतासह आशियावर येताच, भारताने तातडीने सार्क देशांशी संपर्क साधत या संकटसमयी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी जी-२० देशांनाही भारताने साद घातली यातून आदर्शवादी आणि राजकीय वैविध्यतेला दिशा देण्यात भारत वाकबगार असल्याचे सिद्ध झाले. याच समार्थ्याची देशांतर्गत धोरणातही गरज आहे. कोरोनाचे संकट भविष्यातील संहारकतेचा अंदाज देणारे आहे. तसेच राष्ट्रवादाचा अतिरेक करणाऱ्या राष्ट्रांसाठी ही वाजलेली धोक्याची घंटाही आहे.

देशांच्या सार्वभौमत्वाचा गजर हा त्यांच्या जागतिक जबाबदा-यांना सोडून असता कामा नये, याकडे या साथीने लक्ष वेधले आहे. जेव्हा हे जागतिक संकट संपेल, तेव्हा त्यातून जगाने धडा घेत आंतरराष्ट्रीय यंत्रणा आणि संस्था यांचे मजबुतीकरणाला महत्त्व द्यावे. या संस्थांच्या माध्यमातून पुढील भविष्यात असे संकट पुन्हा जगावर येणार नाही, याची खात्री त्यांनी जगाला द्यावी लागेल. काहीं देशांना ही साथ म्हणजे पुन्हा आपल्या स्वार्थी आत्मकोषात जाण्यासाठीची सुवर्णसंधी वाटेल. पण, जगाला नव्या दशकात दिशा देण्याचे ऐतिहासिक काम भारताकडून झाले तर, भारतीय नेतृत्व जगात झळाळून निघेल यात शंका नाही.

पूर्ण

Social Media