श्री रामाच्या मूळ मूर्ती आज ही आहेत सुरक्षित 

शककर्ता चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य(Emperor Vikramaditya) ने २००० वर्षांपूर्वी स्थापन केलेले व जगद्गुरु शंकराचार्यांच्या (Shankaracharyas)शिष्यांनी सुरक्षीत ठेवलेले श्री राम पंचायतन आज ही अयोध्येत विराजमान आहे !!!

२००० वर्षांपूर्वी चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्याने श्री राम जन्म भूमीत अखंड शाळिग्रामापासून बनवलेले श्री राम पंचायतन स्थापन केले होते. १५२८ साली म्लेंच्छ बाबरा चे सैन्य श्री राम मंदिर(Ram Temple) ध्वस्त करणार , मूर्ती भंग करणार असा दृष्टांत शरयू नदी किनारी धर्माप्रचार करणारे जगद्गुरु शंकराचार्यांचे शिष्य स्वामी श्यामानंद सरस्वती या सिद्ध महापुरुषास झाला. त्यांनी बाबराचे सैन्य यायच्या आधी ती मूर्ती काढून शरयू नदीच्या(Sharyu River) डोहात सुरक्षित ठिकाणी पाण्यात लपवून ठेवली. त्यानंतर दृष्टांताप्रमाणें बाबर चे सैन्य आले मंदिर ध्वस्त केले.

Jai-Shri-Ram

त्या नंतर २२० वर्षांनी म्हणजेच १७४८ साली एक मराठी ब्राह्मण श्री नरसिंहराव मोघे शरयू नदीच्या किनारी तपस्या करीत होते तेव्हा त्यांना श्री रामाने दृष्टांत दिला व पाण्यातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी नदीत स्नानासाठी गेले असताना त्यांना ती श्री राम पंचायतन मूर्ती सापडली व आज ती शरयू(Sharyu) किनारी “श्री काळा राम” मंदिरात विराजमान आहे.

Jai-Shri-Ram

या मूर्तीचे दर्शन घेतल्याशिवाय अयोध्या दर्शन पूर्ण मानले जात नाही.

जय श्री राम

हृषीकेश श्रीकांत वैद्य
धर्मसभा सचिव
अखंड भारत
9323395598

 

सरयू तीरावरी….

Social Media