“रमन्ते सर्वत्र इतिराम:||” जो सर्वत्र व्यापून आहे असा राम. “राम(Ram) का गुणगान करिये”, कारण “रामनाम उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे”. राम-नाम हा माणसांच्या जीवनाचा आधार आहे. रामनाम हे मधुर नाव, आपण उच्चारतो, त्यावेळी आपल्याला एक वेगळीच अवस्था प्राप्त होत असते. राम(Ram) शब्द लहान आहे परंतु त्याची व्याप्ती विशाल आहे. सर्वांना आनंद आणि समाधान देणार असं नाव म्हणजे राम(Ram). या नामाने, मन आणि आत्म्याला अखंड तृप्ती प्राप्त होते. रामनामाचा जयघोश करीत असताना मनामध्ये सदविचार प्रवाहित होतात. आणि सदविचारांतून सदाचाराचे पोषण होत असते.
जो सुंदर आहे, दर्शनीय आहे, असा राम. श्रीराम (Jai Shri Ram)हे कल्पवृक्षाचे उद्यान असून सर्व संकटे दूर करून त्रैलोक्याला आनंद देणारे माझे स्वामी आहेत. भगवान राम मनोज्ञ आहेत म्हणजे मनातलं जाणणारे आहेत. राम(Ram) राज्यात भगवान प्रभू श्रीरामचंद्रांनी सती अहिल्येचा उद्धार केला. “भक्तरक्षण” हे तर त्यांचे ब्रीदचं आहे.
“राम” (Ram)दोन अक्षरी हे नाव, एक पूर्ण मंत्र(mantra) आहे. सर्वात लहान आणि प्रभावशाली असे हे नाव “राम”. म्हणूनच आजही आपल्या भारतीय संस्कृतीत “राम राम” तसेच “जय श्रीराम” म्हणून अभिवादन करण्याची रुढी कायम आहे. आजही आपला शेतकरी बांधव, धान्याचे फिल माप टाकतांना, एक ऐवजी “राम” म्हणतात.
श्रीराम- कृपाळू. भवभय, दारिद्र यांचे दहन करणारे नाव श्रीराम. सभ्यतेचे प्रतीक, आनंदाचे धाम आणि विश्वाचा विश्राम असे श्रीराम. नादातून ज्यांच्या नावाचा गुंजारव होतो ते नाव म्हणजे श्रीराम. ज्यांच्या नावाची विजय पताका(Victory flag) सदैव अंबरी झळकत असते आणि जे आपल्याला प्रोत्साहित करून मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त करीत असतात असे श्रीराम.
भक्तीच्या पराकाष्ठेवर माणूस राममय होतो.
भक्तीच्या पराकाष्ठेवर माणूस राममय होतो. त्याला इतर काहीच दिसत नाही. त्याला सर्वत्र मर्यादा पुरुषोत्तम रामच दिसतो. रामनाम (Ramnaam)हे एक असे अमृत आहे जे माणसाच्या जीवनाला सुख, शांती आणि समृद्धी देते. जेव्हा माणूस रामनामाचा जप करतो तेव्हा त्याच्या मनातील वाईट विचार दूर होतात आणि त्याच्या मनात सकारात्मक विचारांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे त्याला क्षणोक्षणी सुख जाणवू लागते. रामनाम हे केवळ सुख देणारेच नाही तर ते माणसाला मोक्ष प्राप्ती करून देणारे ही आहे. रामाचं नाव इतकं साधं, सोपं, सरळ आणि मधुर आहे की, जेव्हा आपण रामनामात एकाग्र होतो, तल्लीन होतो तेव्हा, आपल्यालाला ईश्वर प्राप्तीची अनुभूती होते. प्रभुरामाच्या पंचायतनाचा अनुभव यायला लागतो. सत-चित-आनंद अशा सच्चिदानंदाची खाण म्हणजे श्रीराम. श्रीराम(Shri Ram) हे नावच रामबाण आहे. ते व्यर्थ न जाता लक्षवेध केल्याशिवाय राहात नाही.
वचन जेवी रामबाण, कदा नव्हे अप्रमाण, निश्चयेशी समान, राम राम बोलणे|| श्रीराम हे आपल्या शरीराचे मुख्य प्राण आहेत.
“राम नाम हे मधुर बहू, मन राम रंगी रंगले| अवघे मनची राम झाले, चित्तचि हरपले, अवघे चैतन्यची झाले||.
“राम नाम हे मधुर आहे. ते जिभेवर रसास्वाद घालते आणि मनाला आनंद देते.
राम नाम हे सुंदर आहे, जणू कमळाच्या फुलासारखे. ते डोळ्यांना मोहित करते आणि मनाला शांती देते.
राम नाम हे पवित्र आहे, जणू गंगा नदीसारखे. ते पापांना धुवून टाकते आणि आत्म्याला शुद्ध करते.
राम नाम हे शक्तिशाली आहे, जणू वज्रासारखे. ते भक्तांना सर्व दुःख आणि संकटांपासून मुक्त करते.
भक्त राम नामाचे स्मरण करून आनंदित होतात आणि त्यांचे जीवन धन्य झाल्याचे मानतात. ते इतरांनाही राम नामाचा जप करण्याचे आवाहन करतात.
“मन राम रंगी रंगले, अवघे मनची राम झाले|” या अभंगात संत एकनाथ महाराज भक्तीच्या पराकाष्ठेचे वर्णन करतात. ते म्हणतात की, जेव्हा भक्ताचे मन पूर्णपणे राममय होते तेव्हा त्याला इतर काहीच दिसत नाही. त्याला बाहेर आणि आत सर्वत्र रामच दिसतो. “हे रोमरोम मे बसने वाले राम”. त्याचे चित्त रामरूपात लीन होते आणि त्याचे संपूर्ण चैतन्य राममय होते.
संत तुकाराम महाराज(Sant Tukaram Maharaj) म्हणतात, “रामनाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे|”
जेव्हा माणसाला रामनामाची आवड लागते तेव्हा त्याला क्षणोक्षणी सुख वाढू लागते.
रामनाम हा माणसाच्या जीवनाचा आधार आहे
रामनाम हा माणसाच्या जीवनाचा आधार आहे. जो माणूस रामनामाचा जप करतो तो जीवनात सुखी आणि यशस्वी होतो.
रामाचे नाव हे धर्मवृक्षाचे बीज आहे. होय, रामाचं नाव हे धर्मवृक्षाचे बीज आहे. “राम” हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे नाव घेणे म्हणजे धर्माचरण करण्याचा संकल्प करणे. राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि त्यांच्या नावात असीम शक्ती आहे.
समर्थ रामदास स्वामींचा(Samarth Ramdas Swami) “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” हा श्लोक. सकाळी उठल्यावर माणसाने प्रथम भगवान रामाचे नाव घेऊन त्याचे चिंतन करावे. भगवान रामाचे चिंतन केल्याने मन शांत होते. सत्य बोलणे, प्रेमळ वागणे आणि इतरांना मदत करणे, सदाचाराने वागणे आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन मिळून मानव धन्य होतो. खडीसाखरे सारखे नाम भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन कशातूनही घ्या आनंदच मिळतो. राम नाम घ्यायला, राम कार्य करायला, राम आठवलाच पाहिजे. त्यासाठी वेळ काढलाच पाहिजे.
हनुमंताने श्रीरामांना जे मागणं मागितलं तेच आपणही मागू या. “प्रभू मज एकची वर द्यावा| या चरणांच्या ठाई माझा निश्चय भाव राहावा, प्रभू मज एकच वर द्यावा||.
||जय श्रीराम||(Jai Shri Ram)