नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सत्र 1 च्या संयुक्त प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. NTA ने आज पहाटे 3 वाजता जेईई मेन परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेला बसलेले विद्यार्थी https://jeemain.nta.ac.in/ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल आणि त्यांचा रॅंक चेक करू शकतात.
NTA प्राधिकरणाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर JEE मुख्य परिक्षेचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी लिंक देखील जारी केली आहे. विद्यार्थांना त्यांचा निकाल डाऊनलोड करायचा असेल तर या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करता येईल.
विद्यार्थ्यांना जेईई मेन परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख मेंन्शन करावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हा निकाल दिसेल.