मुंबई : झुंड चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी अमिताभ यांनी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाबद्दल सांगितले.
संदीप सिंग एका मुलाखतीत म्हणाले, ‘बच्चन यांना या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली. कमी बजेटमध्ये हा चित्रपट कसा बनवायचा, असा प्रश्न आम्हाला पडला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मानधन कमी केले. माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा चित्रपटांवर पैसे खर्च करायला हवेत, असे ते म्हणाले होते. तसेच, अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांचे मानधन कमी केले.
View this post on Instagram
संदीप सिंह पुढे म्हणाले, 2018 मध्ये नागराजने पुण्यात हा चित्रपटासाठी सेट केला होता. मात्र पैशांअभावी हा सेट रद्द करण्यात आला. आम्ही टी-सीरिजच्या मदतीने चित्रपटाचे शूटिंग सुरू केले, आम्ही संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण नागपुरात केले. यासाठी मी भूषण कुमार यांचे आभार मानतो.,
View this post on Instagram
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 4 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.