जॉन्सन एँड जॉन्सनची वॅक्सीन डेल्टासह इतर कोरोना व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी : कंपनीचा दावा

वॉशिंग्टन : जॉन्सन एँड जॉन्सन (Johnson & Johnson’s vaccine)कंपनीने गुरूवारी सांगितले की, त्यांच्या सिंगल-शॉट कोरोना वॅक्सीनने डेल्टासह इतर व्हेरिएंटविरूद्ध तीव्र प्रतिक्रिया दर्शविली आहे आणि ही लस संसर्गाविरूद्ध अधिक व्यापकरित्या टिकाऊ संरक्षण प्रदान करते.

ही लस ८५ टक्के प्रभावी

This vaccine is 85 percent effective

हेल्थकेअर कंपनीने सांगितले की, आकडेवारीनुसार असे लक्षात येते की लस घेतलेल्या लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमीत-कमी आठ महिन्यांपर्यंत कायम होती. ही लस ८५ टक्के प्रभावी आहे तसेच रूग्णालयात दाखल होणे आणि मृत्यूपासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. जागतिक आरोग्य संस्थेनुसार(WHO), येत्या काळात कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट जगभरात वर्चस्व गाजवेल. सध्या जगातील ९६ देशांमध्ये या व्हेरिएंटची प्रकरणे आढळून आली आहेत. जिनोमची अनुक्रम (सिक्वेन्सिंग) क्षमता मर्यादित असल्याने वास्तविक आकडेवारी त्याहून अधिक असू शकते.

जॉन्सन एँड जॉन्सन कंपनीची सिंगल-शॉट कोरोना वॅक्सीन

Johnson And Johnson Co’s single-shot Corona Vaxin

जॉन्सन एँड जॉन्सन च्या औषध व्यवसायातील, संशोधन आणि विकास प्रमुख मथाई मैमन यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत अभ्यास केलेल्या आठ महिन्यांच्या वर्तमान आकडेवारीनुसार असे लक्षात येते की, जॉन्सन एँड जॉन्सन कंपनीची सिंगल-शॉट कोरोना वॅक्सीन एक मजबूत तटस्थ प्रतिपिंड प्रतिक्रिया (न्यूट्रलायझिंग एँटीबॉडी) निर्माण करते, जी कमी होत नाही, तर काळाबरोबर यामध्ये सुधारणा पहायला मिळते. अमेरिकेतील फार्मा कंपनीने सांगितले आहे की वॅक्सीन घेणाऱ्या लोकांमध्ये डेल्टासह सर्व व्हेरिएंटविरूद्ध तीव्र न्यूट्रलायझिंग एँटीबॉडी असल्याचे आढळून आले आहे.

कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास – 

मागील आठवड्यात डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेबरेसस यांनी डेल्टा व्हेरिएंटला आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना व्हेरिएंट्स मध्ये सर्वाधिक संक्रामक असल्याचे म्हटले आहे. हा व्हेरिएंट सर्वात प्रथम भारतात आढळून आला आहे. या व्हेरिएंटमुळे ब्रिटनमध्ये आणखी एक महिन्यासाठी निर्बंध वाढविण्यात आले. फायझर-बायोटेक, मोडर्ना इंक, आणि एस्ट्रॅजेनेका यांच्यासह इतर लस उत्पादकांनी आधीच म्हटले आहे की त्यांची कोरोना लस वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहे.
Johnson & Johnson’s vaccine is very effective against other corona variants including Delta, claims the company.


कोविडविरूद्ध तिसऱ्या डोसची आवश्यकता कदाचित भासणार नाही : ऑक्सफोर्ड –

कोविडविरूद्ध लसीचे दोन डोस प्रभावी तिसऱ्या डोसची आवश्यकता कदाचित भासणार नाही : ऑक्सफोर्ड अभ्यासाचा दावा

गर्भवती महिलांच्या लसीकरणाविषयी आरोग्य मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे… –

गर्भवती महिला देखील कोव्हिड-१९ लस घेऊ शकतात, आरोग्य मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे

Social Media