‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास(Prabhas) सध्या ‘सालार'(‘Salar’) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अशातच आता प्रभास(Prabhas) पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवण्यास सज्ज झाला आहे. प्रभासचा ‘कल्कि 2898 एडी'(Kalki 2898 AD) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे.

नाग अश्विन(Nag Ashwin) दिग्दर्शित हा सिनेमा 9 मे 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘कल्कि 2898 एडी’ या सिनेमात प्रभास आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)आणि कमल हासन(Kamal Haasan)देखील या सिनेमाचा भाग असणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सिनेप्रेमी आणि प्रभासचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र प्रेक्षकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Social Media