कंगनाने ‘कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नाच्या’ बहाण्याने वयावरून केली टिप्पणी

मुंबई : बॉलिवूड दिवा कतरिना कैफ((Katrina Kaif ) आणि सध्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) उद्या म्हणजेच ९ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या (Rajasthan)सवाई माधोपूरमध्ये(Sawai Madhopur) दोघांच्या लग्नाचे ग्रँड फंक्शन सुरू आहे.

आज हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood)या लग्नाची चर्चा अनेक कारणांनी जोरात सुरू आहे. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर टीका करणाऱ्या कंगना राणौतने कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नातून बॉलिवूडच्या कामाचे कौतुक केले आहे. खरं तर, कंगनाने चित्रपटसृष्टीचं अभिनंदन केलं आहे की, इथल्या लिंगाबाबतचा रूढीवाद मोडला.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वयाशी संबंधित लिंग स्टिरियोटाइपबद्दल एक टिप्पणी केली आहे. कंगनाने लिहिले – जेव्हा मी मोठी होत असताना अशा अनेक कथा ऐकल्या होत्या, ज्यामध्ये श्रीमंत लोक अनेक वर्षांपासून लहान मुलींशी लग्न करत असत. पतीपेक्षा महिला अधिक यशस्वी होणे हे संकट म्हणून पाहिले जात होते.

कमी वयाच्या मुलाशी लग्न करणे विसरून जा, विशिष्ट वयानंतर स्त्रीशी लग्न करणे देखील अशक्य होते. इंडस्ट्रीतील यशस्वी आणि श्रीमंत आघाडीच्या महिला या लैंगिकतावादी परंपरा मोडत आहेत हे पाहून आनंद होतो. अशा स्त्री-पुरुषांना सलाम, जे हा लिंगभेद मोडत आहेत. कतरिना आणि विकीच्या वयात ५ वर्षांचे अंतर आहे. 38 वर्षीय कतरिना विक्कीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे.

तसे, कतरिनाच्या आधी प्रियांका चोप्रा तिच्यापेक्षा लहान वयाच्या  तरुणाशी लग्न केल्यामुळे खूप चर्चेत होती. प्रियांकाने 2018 मध्ये अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनासशी विवाह केला जो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. वयाच्या या अंतरावर प्रियंका स्वतः अनेकदा बोलली आहे. कतरिना कैफसोबत विकीच्या रिलेशनशिपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूडमध्ये चर्चेत होत्या, मात्र या दोन्ही कलाकारांनी याबाबत जाहीरपणे काहीही सांगितले नाही. विशेष म्हणजे या लग्नाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Bollywood diva Katrina Kaif and one of the best actors of the current generation Vicky Kaushal will tie the knot tomorrow i.e. December 9. The grand function of the two’s wedding is going on in Sawai Madhopur in Rajasthan.

Social Media