लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणाऱ्यांवर कंगनाचा संताप; ट्विटरवर विचारला प्रश्न

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत ने लव्ह जिहाद कायद्याचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावर नाव आणि धर्म लपवून हिंदू मुलीशी लग्न केल्याची बातमी सामायिक करताना हा प्रश्न विचारला आहे.

जिहाद कायद्याचा विरोध करणार्‍यांना देखील कंगना प्रश्न विचारत आहे. कंगना रणावत ने ट्वीटद्वारे विचारले आहे की, ‘दररोज आपण अशा बर्‍याच घटनांबद्दल ऐकत असतो. या लव्ह जिहाद कायद्यात काही लोकांना काय त्रास आहे हे मला समजत नाही. हे प्रेम विवाह आहे आणि त्यांची खरी ओळख प्रकट करून दोघांचे लग्न होत आहे, मग हे दोघांचेही चांगले आहे पण जर एखाद्या स्त्रीची फसवणूक झाली तर तिच्या न्यायासाठी कोण लढा देईल? ‘

कंगनाचे नुकतेच सोशल मीडियावर फिल्म अभिनेता दिलजित दोसांझ याच्याशी भांडण झाले होते. कंगना ने शेतकरी चळवळीत भाग घेणाऱ्या एका वृद्ध महिलेचे शाहीन बागची आजी असल्याचे वर्णन केले होते. त्याबद्दल बरीच खळबळ उडाली होती. नंतर ती पोस्ट डिलीट केली होती मात्र तोपर्यंत प्रकरण बर्‍यापैकी वाढले होते.

यापूर्वी कंगना रणावतचे शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी जोरदार वाद झाले होते. त्यामुळे तिच्या मुंबईतील कार्यालयाचेही नुकसान झाले होते, ज्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आले. कोर्टाने कंगना रणावतच्या बाजूने निकाल दिला आणि महाराष्ट्र सरकारला फटकारले देखील होते.

कंगना तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर राजकीय विषयांवर खूप बोलली आहे. कंगनाने ट्विट करून भारत बंद किंवा देशव्यापी संपाविषयी ट्वीट केले होते. कंगनाने तिच्या ट्विटर अकाउंटवर हिंदीमध्ये एक व्हिडिओ आणि एक संदेश शेअर केला आहे. आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची एक क्लिप तिने शेअर केली होती. कंगना लवकरच धाकड आणि तेजससारख्या चित्रपटात दिसणार आहे.

tag-kangana ranaut/love jihad/

Social Media