16 कोटींमध्ये बनवला ‘कंतारा’, 400 कोटींची कमाई, येऊ शकतो चित्रपटाचा भाग-2

मुंबई : ऋषभ शेट्टीचा (Rishabh Shetty)कांतारा (Kantara)हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असला तरी तो अजूनही चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने यशाचे नवे झेंडे रोवले आहेत. कर्नाटकात मोठा हिट म्हणून उदयास आलेला ‘कंतारा’ लवकरच तेलुगू, हिंदी आणि मल्याळम आणि जगभरात हिट झाला.

जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर त्याचे कौतुक केल्याशिवाय राहता येणार नाही, आता ‘कंतारा’च्या(Kantara) निर्मात्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाचे बजेट जवळपास 16 कोटी आहे.

रिलीज होऊन जवळपास दोन महिने उलटल्यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, ही एक कौतुकास्पद कामगिरी आहे. ‘कंतारा’ (Kantara)हा ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनय केलेला अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. जगभरात यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनने 400 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने कर्नाटकातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत 168.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कांताराने केरळ (रु. 19.2 कोटी), उत्तर भारत (96 कोटी) आणि तेलुगू राज्यांमध्ये (60 कोटी रुपये) चांगली कामगिरी केली आहे.

त्याचबरोबर या चित्रपटाने विदेशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 44 कोटींची कमाई केली आहे. तामिळनाडूमध्ये 12.70 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. कांतारा हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे जो भूत कोला या देवतेसाठी सादर केल्या जाणार्‍या पारंपारिक नृत्याभोवती फिरतो. चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये किशोर, अच्युथ कुमार, सप्तमी गौडा आणि प्रमोद शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत.

KGF फ्रँचायझी, हंबेल फिल्म्सच्या बॅनरखाली विजय किरगंडूर यांनी कांताराची निर्मिती केली आहे. ऋषभने काही काळापूर्वी सांगितले होते की कांताराचा सीक्वल देखील येऊ शकतो कारण त्यात अनेक सबप्लॉट्स आहेत जे पुढील संशोधनाचा आधार बनतात. ते पुढे म्हणाले की, त्याचा प्रीक्वेलही येण्याची शक्यता आहे.

Social Media