आपट्यांची झाडे लावून केले नवरात्री कन्या पुजन

चंद्रपूर : घटस्थापना झाली जागुणी नवरात्र, नऊ कन्यांच्या हातून लावू आपट्यांची रोपटं…. सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या प्रेरणेने “आठवणीतील फुलझाड” या संकल्पनेतून अजय बहूउद्देशीय संस्था चंद्रपूर व स्नेहराई वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन फाऊंडेशन चंद्रपूर याच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या सुविद्य पत्नी लिना अरविंद साळवे यांच्या हस्ते नऊ कुमारिकांना आपट्यांची झाडे देऊन पार पडला.

दसरा म्हटले की आपट्यांची पाने “सोनं” म्हणून लूटण्याची परंपरा शेकडो वर्षापासून प्रचलित आहे. या चुकीच्या प्रथेमुळे असंख्य आपट्यांची व कांचनची झाडे ओरबाडली जातात.आपट्यांची व कांचन ची पाने दिसायला सारखीच असतात पण नागरिकांनी या दोन्ही झाडांची पाने तोडू नये आणि त्याची रोपे सोनं म्हणून वाटावीत..

असाच हा आपट्यांची झाडे कुमारीकांना वाटून ती त्यांच्याच हाताने लावण्याचा आगळा वेगळा उपक्रम चंद्रपूरी पोलिस मुख्यालयी पार पडला..या आपट्यांच्या झाडांचे संगोपनाची जवाबदारी संस्थेने घेतली असून या कुमारीका आपल्या वाढदिवसी त्यांनी लावलेल्या झाडाला भेट देतील..ह्यावर्षी पासून आपट्यांची रोपटे लावण्याची परंपरा दरवर्षी अशीच सुरु ठेवण्याची जवाबदारी संस्थेने उचलली आहे.

या पर्यावरणीय उपक्रमास लीना अरविंद साळवे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल संस्थेचे वतीने त्यांचे खुप खुप आभार.व कुमारीकांच्या सोनपावली आगमनाने येऊन आपट्यांची रोपटे लावून सगळ्यांचा आनंद द्विगुणीत केल्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. डि.आय नागरकर सर व वेळोवेळी मदत करणारा शुभम यांचेही आभार व सर्व सहकारी पदाधिकारी यांचेही आभार.

 

शाहरुख खान ‘मन्नत’ विकणार आहे का? किंग खानने दिले रंजक उत्तर

 

 

Social Media