आम्ही बरे झालो…कर्कासूर मर्दिनीने केली कोरोनावर यशस्वी मात !

अनामिक भीतीने सारे जग गेली वर्षभर हादरले होतं. आपले कित्तेक नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, या कोरोना (corona)नावाच्या आजाराने ग्रासले होते. कोणी सोडून सुद्धा गेलेत. एव्हाना जानेवारी २०२१ मध्ये, कोरोना प्रतिबंधक लस देशात उपलब्ध झाली. आणि एक मार्च नंतर ४५ च्या वरील सह-आजारी सुद्धा ही लस घेऊ शकतात असा नियम आला. आम्ही तिघांनीही ती लस घेतली. मार्चच्या अगदी पहिल्याच आठवड्यात. आम्ही म्हणजे मी, आमची आई, आणि माधुरी. आमची वयं काय म्हणालात? तर आईच वय ८२ वर्ष आणि आम्ही साठीच्या घरातले. एव्हाना दुसरा डोस घेण्याची पण आता वेळ आली होती. आणि…हाय रे दैवा! घात झाला. कुठेतरी माशी शिंकली. आणि… सौ माधुरीला ताप आला. दोन दिवस घरगुती औषध झालीत. दिनांक चार एप्रिल ला डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि निदान झालं “कोरोना पॉझिटिव।“(Corona Positive)

 

आजारासंबंधी कल्पना दिली(Given an idea about the disease)

मी डॉक्टरांना माधुरीच्या प्रकृती बद्दल सांगितलं. तिच्या आजारासंबंधी कल्पना दिली. सगळे “पॅरामीटर”(parameter) बघून डॉक्टर म्हणाले की यांनी घरीच राहायचं. फक्त वेगळ्या खोलीमध्ये. स्वतःला इतरांपासून अलिप्त ठेवायचं. (आयसोलेट/क्वारांटाइन)(Isolate/Quartine). कोणाशी संपर्क येता कामा नये. दिलेली औषधे घ्या. बरं वाटेल. दोन दिवसात बरं नाही वाटलं, तर आपण सिटीस्कॅन (CityScan)करू या. नंतर बघू काय करायचं ते. आता घरीच थांबा. घाबरायचं नाही. आम्हाला एकदम धीर आला. घरी थांबायला सांगितल्यामुळे अजूनच बरं वाटलं. सुरवातीची तीन दिवस जरा अवघड गेलीत. कधीही एकट्याने रहायची सवय नाही. दुरून दिले जाणारे जेवण, वगैरे. पण करणार काय?. तिसऱ्या दिवशी तिला बर वाटायला लागलं. ताप नव्हता. खोकला कमी झालेला.
इकडे मी आणि आई, स्वयंपाक, भांडी यात आमचे दिवस जायला लागलेत. तीन चार दिवस आम्ही बरे होतो. आणि आईला ताप आला. तापाची गोळी दिली ताप कमी झाला पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चढला. मनात शंकेची पाल चुकचुकली. आता तर मलाही तापाची कंणकण जाणवायला लागली.

दिनांक १० एप्रिल २०२१. सायंकाळी आईला टेस्ट करायला घेऊन गेलो. तिला जरा लूज मोशन सुरु झाल्याने घाबरलो होतो. Antigen करून घेतली. अवघ्या सात मिनिटात. रिपोर्ट आला, “कोरोना पॉझिटिव्ह”! मानसिक तयारी (mental preparation)होतीच. मी म्हटलं, “माझी पण करून घ्या”. लगेच दोन्ही नाकपुडीतून स्त्राव घेतले गेले. पाच ते सात मिनिटात रिपोर्ट तयार. “कोरोना पॉझिटिव्ह”! झालं एकदाचं. त्या दिवशी बाहेर प्रचंड वादळ सुटलं होतं. मनातही नको नको त्या विचारांच्या वादळाने थैमान घातलेलं. आम्ही गाडीत बसलो. आईने विचारलं “काय रिपोर्ट आहे?” मी म्हणालो “पॉझिटिव्ह!”. तिने दीर्घ सुस्कारा सोडला. आणि “तुझा?”. तो सुद्धा “पॉझिटिव्ह”! अशातही ती म्हणाली, “आता तिघांनाही घरीच एकत्र राहता येईल”. मी गाडी सुरु केली. गाडीतून डॉक्टरांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. फोन स्विच ऑफ होता. मी त्यांना message टाकला. घरी पोहोचलो. घरी आमची वाट बघत असलेल्या आमच्या “कोरोना पॉझिटिव” सौभाग्यवतींने, माधुरीने तिच्याच खोलीतून प्रश्न केला, “काय हो? काय रिपोर्ट?”. मी म्हणालो, दोघेही पॉझिटिव”! तीनेही दीर्घ श्वास सोडला.

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरु झालीत. त्यांच्याच सल्याने आम्ही तिघे “कोरोना पोझीटीव्ह”(Corona Positive)) एकत्र राहायला लागलोत. अगदी घरातही “मास्क” घालून. शक्य तितक अंतर राखून. आता माधुरीला आठ दिवस पूर्ण झाले होते. ती बऱ्यापैकी दुरुस्त झाली होती. स्वयंपाकाचा ताबा तिने घेतला. गुढी पाडव्याच्या दिवशी “कुंडी” मध्ये गुढी उभारून तीने संस्कृती रक्षणाच (Culture Protection)कार्य अगदी बेमालूमपणे केलं.

श्री गुरुचरित्रात सांगितल्या प्रमाणे “सांडोनी संशय धरी निर्धार, श्री गुरुमूर्ती देईल अपार, सहज गुरुकृपा सागर, तुज नुपेक्षि सर्वथा||”

यावेळी आमचे डॉक्टरच आमच्यासाठी देवाच्या रुपाने धावून आलेत, असं म्ह्टलं तर अतिशयोक्ती होणार नाही. पूर्ण विश्वासाने औषध घ्यायला सुरुवात झाली आणि आपला विश्वास बसणार नाही अगदी दुसऱ्या दिवशी आईचा आणि तिसऱ्या दिवशी माझा ताप कमी झाला. आम्हाला हळुहळू पूर्ण बरं वाटायला लागलं. आज माधुरीला एकवीस दिवस आणि आम्हाला चौदा दिवस झालेत. म्हणूनच हा अनुभव आपल्यासोबत शेअर करण्याचं धाडस करतोय.
मानसिक बळ(mental strength) हे अध्यात्माच्या रूपातून मिळत होतं. सद्गुरूंचे अखंड नामस्मरण, अध्यात्मिक ग्रंथाचं जमेल तसं वाचन, सायंकाळी नित्याची रामरक्षा, मारुती स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र हे गेली वर्षभर अव्याहत सुरु आहेच.

अशाही परिस्थितीमध्ये माधुरीने(Madhuri) स्वतःला सावरलं. तिचा सकारात्मक दृष्टिकोन हा नेहमीच तिला आलेल्या संकटांवर मात करण्यास सहाय्यभूत ठरतो. दुर्दम्य आत्मविश्वासामुळेच दोन वेळा कर्करोगासारख्या(Cancer) जीवघेण्या आजारावर माधुरीने विजय मिळविला. तिचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अफलातून आहे. याच सकारात्मक उर्जेच्या बळावर गेली सोळा वर्षे ती समाजातील महिलांमध्ये जावून “स्तन कर्करोग(Breast Cancer) जनजागृती अभियान” चालविती आहे. नेहमीच ती तिच्या डॉक्टरांना देवरूपातच बघते. आजही “कोरोना” ची ट्रीटमेंट देणारे डॉक्टर हे आमच्यासाठी देवदूतच. या “कोरोनारूपी राक्षसा”वर सुद्धा माधुरीने विजय मिळविला. त्यावर मात केली.

आईबद्दल काय सांगायचं?. “धैर्याचं” मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमची आई. माधुरीच्या आजारपणात वर्ष वर्ष स्वयंपाक घराचा ताबा घेवून गृहस्थी नीट चालविणारी आमची आई, ग्रेटच आहे. अगदी आताही, “घाबरायचं नाही. आपण लस घेतली आहे. काही होणार नाही” असा आशावाद निर्माण करणारी आमची धैर्यशील आई. “कोरोना”चा खुप असा त्रास आम्हाला झाला नाही. त्याची दोन महत्वाची मला जाणवलेली कारणे म्हणजे :

 

आम्ही घेतलेली कोरोना प्रतिबंधक लस(The corona prevention vaccine we took)

 

लस घेवून आम्हाला जवळजवळ वीस दिवस झाले होते. निश्चितच त्याचा फायदा आम्हाला झाला. हा आजार तीव्र रूप धारण करू शकला नाही. आम्हा तिघांचीही ऑक्सिजन लेव्हल नेहमीच ९६ च्या वरच आहे. आमची जीवनशैली:- गेल्या वर्षभरापासून रात्रीच्या वेळी दुधात हळद टाकून ते दूध घेणे, सकाळचा दहा मिनिटांचा प्राणायाम. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा अल्पसा प्रयत्न. या दरम्यान दररोज सकाळ संध्याकाळ वाफ घेणं हे सुरू आहे. “मास्क” हा आपला नित्याच्या पेहाराव्यातील एक घटक असं समजूनच चालायचं.

या कोरोना सारख्या जीवघेण्या आजारातून आमच्या सद्गुरूंनी आम्हा तिघांनाही सहीसलामत पार करून दिलं. आपल्यासारख्या अनेक हितचिंतकांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा मुळे आज आम्ही तिघांनीही करोना वर मात केलेली आहे. घरीच आहोत. सुरक्षित आहोत. पुढील पंधरा दिवस बाहेर पडणार नाही.

सगळ्यांना कळकळीची विनंती. येत्या १ मे पासून कोरोना प्रतिबंध लस अठरावर्ष वरील सर्वांसाठी उपलब्ध होत आहे, ती लस सर्वांनी. होय! अगदी सर्वानीच घ्यायला हवी. होय! तरुणां सोबतच आजवर ज्यांनी नाही घेतली त्यांनी सुद्धा!कोरोना मुळे येणाऱ्या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी ते एक कवच ठरते आहे. जीवनशैलीमध्ये छोटासा बदल, प्रतिकारक शक्ति अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न, घराबाहेर कुठल्याही कामाविना बाहेर न पडणे, बाहेर पडतांना “मास्क”, वापरावा, एवढचं याप्रसंगी सांगावस वाटतं.
जातील, हेही दिवस जातील….

“मन मे है विश्वास, पुरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन….”

There is faith in the mind, there is full faith, we will succeed one day

 

The medicines started on the advice of the doctor. With their salinity, the three of us started living together in corona poszitive (Corona Positive). Even at home wearing a “mask”. Keeping as much distance as possible. Madhuri was now eight days old. It was fairly corrected. She took control of the cooking. On the day of Gudi Padwa, she did the work of protecting culture (Culture Protection) by erecting a doll in the “kundi”.

श्रीकांत तिजारे

Social Media