कार्तिक आर्यनने या अंदाजात साजरा केला ‘रोज डे’!

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Karthik Aryan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो आणि बऱ्याचदा त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ‘रोज डे’ साजरा करताना दिसत आहे.Karthik Aryan celebrates ‘Rose Day

व्हिडिओ पाहताना हे एका शॉपिंग मॉलसारखे दिसत आहे ज्यात अभिनेता कार्तिक आर्यन गुलाब(रोज)(Rose Day) एका लहान मुलीला देताना दिसत आहे. मुलीची निरागसता पाहून कार्तिक हसतो आणि तिच्याकडून गुलाबाचे फुल घेतो आणि नंतर त्या मुलीसह त्याने फोटो देखील क्लिक केले. व्हिडिओमध्ये अभिनेता कार्तिक मल्टी कलरची टी-शर्ट जॅकेट घातलेला दिसत आहे. कार्तिन आर्यन ने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आणि ‘ऐसा रोज डे,रोज रोज आये.. एव्हरीडे कम.’ असं कॅप्शन लिहिलं आहे.

नुकताच तो त्याच्या आगामी ‘धमाका’ या चित्रपटाच्या फी संदर्भात चर्चेत आला होता. असे सांगितले जात आहे की अभिनेत्याने या चित्रपटाचे शूटिंग 10 दिवसात पूर्ण केले आणि यासाठी त्याने 20 कोटी घेतले आहेत. त्याचबरोबर काही माध्यमांच्या वृत्तानुसार, कार्तिकला चित्रपटाच्या शूटिंगसाठी 14 दिवसांचा अवधी देण्यात आला होता, परंतु त्याने 10 दिवसांत शूटिंग पूर्ण केली. बहुतेक चित्रपटाचे चित्रीकरण इनडोअर शूट केले आहे.

या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन(Karthik Aryan) एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्याने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते. टीव्ही चॅनेलमध्ये काम कसे केले जाते आणि खासकरून न्यूज रूममधील वातावरण थेट कव्हरेज दरम्यान कसे असेल हे या चित्रपटात दर्शविण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया-2’ आणि ‘दोस्ताना-2’ साठी देखील चर्चेत आहे. दोस्ताना-2 मध्ये जाह्नवी कपूरच्या विरोधात दिसणार आहे. अलीकडेच तो आणि जाह्नवी कपूर एकत्र गोव्याहून परतत असताना मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते.

 

हेही वाचा…

उर्वशी रौतेलाचा बॅकलेस गाऊनमधील फोटो व्हायरल…

 

 

Social Media