कोरोना काळात व्यायाम करून फुफ्फुसांना ठेवा फिट!

नवी दिल्ली : Covid-19 Lung Fitness: कोरोना विषाणूची दुसरी लाट खूप धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. कोव्हिड-१९चा नवीन स्ट्रेन(strain) लोकांच्या फुफ्फुसांवर वेगाने नुकसान करून खराब करत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत हा विषाणू सर्व वयोगटातील लोकांना आपले शिकार बनवित आहे. यावेळी श्वास घेण्यास अडचण आणि ऑक्सिजन पातळी कमी होण्याची अनेक प्रकरणे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत फुफ्फुसांना मजबूत ठेवण्याची आवश्यकता आहे.

कोरोना काळात फुफ्फुसांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक!

Exercise is essential to keep the lungs fit during corona!

फुफ्फुसांना निरोगी आणि सामन्यपणे कार्य करण्यासाठी फुफ्फुसांना व्यायामाची गरज असते. फुफ्फुस शरीराला ऑक्सीजन देण्याचे कार्य करते. शरीरातील प्रत्येक कार्य ऑक्सीजनवर अवलंबून आहे, ज्यामध्ये पेशींची चयापचय क्रिया देखील समाविष्ट आहे. काही असे व्यायाम आहेत, जे आपल्याला श्वास घेण्यास आणि ऑक्सीजनची पातळी सुधारण्यास मदत करते. हे व्यायामाचे प्रकार तुमच्या फुफ्फुसांना वायूप्रवाह आणि ऑक्सीजनची पातळी अधिक कार्यक्षम बनविण्यास मदत करतात. अनेक लोक फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी व्यायामाविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या व्यायामांविषयीची माहिती….

श्वास रोखणे (Breathlessness exercises) :

फुफ्फुसांना-तंदूरूस्त-ठेवण्यासाठी

या व्यायामासाठी सर्वात आधी दीर्घ श्वास घ्या, त्यांनतर श्वास शक्य तितका वेळ रोखता येईल तेवढा रोखा. हा वेळ लक्षात ठेवून दिवसातून प्रत्येक वेळेला २-३ सेकंद वाढविण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही २५ सेकंदाहून अधिक काळ श्वास रोखलात तर, याचा अर्थ असा आहे की तुमच्या फुफ्फुसांना कोणत्याच प्रकारची समस्या नाही. जर तुम्ही श्वास ३० सेंकदापर्यंत रोखू शकलात, तर याचा अर्थ तुमचे फुफ्फुस निरोगी आहेत.

आहारात बदल (Make this change in diet) :

शरीर एखाद्या विषाणूविरूद्ध लढत असतो, म्हणून त्याच्या दुरुस्तीसाठी उच्च प्रथिनांची (high protien) आवश्यकता असते. जे लोक मांसाहार करतात, ते चिकन, मटण, आणि माशांचे सेवन करू शकतात, परंतु त्यामध्ये तेल आणि तुपाचे प्रमाण कमी ठेवावे. जे लोक केवळ अंडी खातात ते देखील चांगले आहे, अंड्यात देखील प्रोटीनचे प्रमाण असते. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी पनीर आणि सोयाबीन हा प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. गोड पदार्थांपासून दूर रहा कारण कोव्हीड काळात शुगर वाढल्यास, नुकसान होण्याची शक्यता असते. ताज्या फळांचे सेवन करावे. दिवसातून कमीत-कमी १.५ ते २लीटर पाणी प्यावे. तसेच धुम्रपान (स्मोकिंग) करू नये कारण यामुळे तुमच्या फुफ्फुसांना नुकसान होऊ शकते. अल्कोहोल घेतल्याने शरीराची प्रतिकारकशक्ती कमकुवत होते.

सकारात्मक विचार (Keep positive thinking) :

या आजारादरम्यान सकारात्मक विचार करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही सकारात्मक असाल तर यातून लवकर बरे व्हाल.
Your lungs need exercise to keep the lungs healthy and functioning normally. Lungs provide oxygen to the body.


राज्यात म्यूकर मायकोसिस या रोगामुळे ९० जणांचा मृत्यू

म्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Social Media