Tamilrockers, Movierulz सह अनेक वेबसाइटवर KGF-2 चित्रपट लीक

मुंबई : ‘KGF Chapter 2’ जगभरातील सिनेमांमध्ये विक्रमी कमाई करत आहे. साऊथचा सुपरस्टार यश, संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा अ‍ॅक्शन चित्रपट सर्वत्र गाजत आहे. या सगळ्यामध्ये KGF-2 देखील अनेक वेबसाईटवर लीक झाल्याची बातमी आहे. bollywoodlife.com च्या रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणारा हा चित्रपट Tamilrockers, Movierulz आणि इतर अनेक वेबसाइटवर लीक झाला आहे.

त्याच्या टोरेंट लिंक्स (KGF Chapter-2 Download Link) देखील ऑनलाइन शेअर केल्या जात असल्याची माहिती आहे. चित्रपट प्रेमी आणि यशचे चाहते मोठ्या पडद्यावर चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी लोकांना थिएटरमध्ये  जाण्याचे आणि पायरेटेड प्रिंट न पाहण्याचे आवाहन करत आहेत.

13 एप्रिल रोजी, चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस आधी, दिग्दर्शक प्रशांत नील यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक नोट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी लिहिले, ‘8 वर्षांचे रक्त, घाम आणि अश्रू तुमच्या सर्वांसाठी KGF आणण्यात व्यस्त आहेत. आता आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, सिनेमा हॉलमध्ये KGF Chapter 2 HD डाउनलोड लिंक पाहताना इंटरनेटवर व्हिडिओ अपलोड करू नका.

आपण सर्वांनी थिएटरमध्ये KGF ची भव्यता अनुभवूया.’ या चिठ्ठीसोबत त्यांनी लिहिले होते, ‘पायरसीविरुद्धची लढाई तुमच्यापासून सुरू होते! कृपया व्हिडिओ आणि फोटो काढू नका आणि ते ऑनलाइन पोस्ट करणे टाळा! पायरसीला नाही म्हणा.


Alia Ranbir Wedding: रणबीरला सासूकडून करोडोंची घड्याळ; आलियाने पाहुण्यांना दिली काश्मीरची शाल 

 

दिग्दर्शक जयंत गिलाटर यांच्या आगामी ‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात डॉ अमोल कोल्हे…

Social Media