भारताला २१ दशलक्ष डॉलर निवडणूक निधीच्या दाव्याची चौकशी  : परराष्ट्र मंत्रालय 

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी  बायडन प्रशासनाच्या कार्यकाळात भारतात निवडणूक  कार्यक्रमासाठी २१ दशलक्ष डॉलर्स मंजूर केल्याचा दावा केला. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी खुलासा केला. त्यात म्हटले आहे की, हा अहवाल चिंताजनक आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. भारताने म्हटले आहे की या निधीच्या अहवालामुळे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परदेशी हस्तक्षेपाबाबत चिंता निर्माण झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल(Randhir Jaiswal) यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले, अमेरिकेच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या काही अमेरिकन उपक्रम आणि निधी संदर्भातील माहितीची चौकशी संबंधित विभाग आणि प्राधिकरणे करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा किकबॅक दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी गुरुवारी दावा केला की भारताला निवडणूक  कार्यक्रमासाठी  दिलेले २१ दशलक्ष डॉलर्स हे एक ‘किकबॅक’ योजना होती. ट्रम्प यांनी हे वक्तव्य वॉशिंग्टन डीसी येथे रिपब्लिकन गव्हर्नर्स असोसिएशनच्या बैठकीत बोलताना केले. आमच्याकडे स्वतःचे पुरेसे प्रश्न आहेत. आम्हाला आमची स्वतःची मतदार उपस्थिती हवी आहे,” असे ट्रम्प म्हणाले. या आठवड्यात तिसरा प्रसंग आहे जेव्हा ट्रम्प यांनी या निधीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी बुधवारी, ट्रम्प यांनी भारताला निवडणूक  कार्यक्रमासाठी  २१ दशलक्ष डॉलर्स देण्याच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, कारण त्यांनी पुन्हा सांगितले की भारतीय उच्च आयात करांमुळे अमेरिकेला “तिथे प्रवेश करणे कठीण आहे.” त्याआधी, ट्रम्प म्हणाले होते की हा निधी बायडन प्रशासनाचा भारतात कोणाला तरी निवडून आणण्याचा प्रयत्न वाटतो.”डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सांगितले आहे की – २१ दशलक्ष डॉलर्स भारतातील निवडणूक  कार्यक्रमासाठी गेले आहेत याला ते ‘किकबॅक योजना’ म्हणतात. राहुल गांधी आणि काँग्रेस या किकबॅक योजनेचे लाभार्थी होते का हे शोधण्यासाठी चौकशी करणे आवश्यक आहे!” भांडारी  यांनी X वर पोस्ट केले.

भाजपचा डीप स्टेटआरोप

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने वारंवार भारतीय निवडणूक प्रक्रियेत परदेशी हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. भाजपने बायडन प्रशासन आणि जॉर्ज सोरोस यांना उद्देशुन आरोप केला आहे की त्यांनी निधीद्वारे भारताला अस्थिर करण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भांडारी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आणि राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हे कथित किकबॅकचे (Kickback-claim)”लाभार्थी” होते का हे शोधण्यासाठी चौकशीची मागणी केली.

भारत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एरडोगन यांच्या काश्मीरविषयक वक्तव्यावर संतापला

 

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *