कोल्हापूर पुन्हा एकादा महापुराच्या विळख्यात

कोल्हापूर : गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गेले तीन दिवस कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.कोल्हापूर पुन्हा एकादा महापुराच्या विळख्यात सापडला आहे.

पंचगंगा नदीनं (Panchganga river) धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. पुढचे ४८ तास कोल्हापुरसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कोल्हापूर जिल्हयात होत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सन २०१९ साली आलेल्या पुरापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सन २०१९ साली राजाराम बंधारा इथं पंचगंगा नदीची शेवटी शेवटी पाणी पातळी ५५ फूट ६ इंच इतकी होती.आज सायंकाळी ही पाणी पातळी जवळपास ५४ फूट इतकी झाली आहे.

उद्याही मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.पुढचे ४८ तास कोल्हापुरसाठी अत्यंत महत्वाचे आहेत.पुराचा वेढा असणाऱ्या प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफची तिसरी टीम तैनात करण्यात आली असून ती मदत कार्यात सक्रिय झाली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना, ग्रामस्थांना, संसारोपयोगी वस्तू तसंच जनावरांना बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत.

पूरग्रस्त प्रयाग चिखली, आंबेवाडी भागातील बहुतांशी नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. उर्वरित सर्व नागरिकांचं सुरक्षित स्थळी युद्धपातळीवर स्थलांतर करण्यासाठी एनडीआरएफ पथकं आघाडीवर आहेत.भर पावसात पुरग्रस्तांसाठी मदतकार्य करणारे एनडीआरएफचे जवान आणि स्वयंसेवकांच्या कामाचं कौतुक होत आहे.

शहरात देखील काही भागात पुराचं पाणी वाढत आहे.शहर आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांचं प्रशासनाच्या वतीनं स्थलांतर करण्यात येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 टीम काल दुपारी तर आज आणखी एक टीम दाखल झाली आहे. प्रत्येकी एका टीममध्ये 3 बोटी, 3 अधिकारी, 25 जवान आहेत.

सांगली-कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. मांगुर फाट्याजवळ पुराचे पाणी आल्यानं राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता.राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या , दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

पन्हाळगडावर भूस्खलनामुळे पन्हाळा कोल्हापूर रस्ता बंद झाला आहे.अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत पण सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

The Panchganga river has crossed the danger level and the flood situation in the district is getting serious. The next 48 hours are very important for Kolhapur. Incessant rains in the Kolhapur district are increasing the water level of all rivers including the Panchganga river.


गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे 33 ही गेट उघडण्यात आले – SanvadMedia

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे 33 ही गेट उघडण्यात आले

Social Media