कोकण रेल्वे आता लवकरच विद्युत उर्जेवर धावणार

रोहा, रत्नागिरी : कोकण च्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा व महत्त्वाकांक्षी असलेली कोकण रेल्वे आता लवकरच विद्युत उर्जेवर धावणार आहे. कोकणात धावणाऱ्या गाड्या या आतापर्यंत डिझेल या इंधनावर धावत आहेत.

 

रोहा- रत्नागिरी या रेल्वे मार्गावर विद्युतीकरण यशस्वी झाले असून विद्युत इंजिन रोहा – रत्नागिरी धावले.

सध्या रायगड जिल्ह्यातील रोहा ते रत्नागिरी जिल्ह्यातील असलेल्या रत्नागिरी या ( रोहा – रत्नागिरी ) एकूण 203 किलोमीटर अंतरावर अती व्होल्टेज 25000 किलो watt क्षमतेचे विद्युत प्रवाह जोडणीचे काम पूर्ण झाले आहे.

रोहा – रत्नागिरी

स्थानकांदरम्यान रेल्वे च्या विद्युतीकरण चे काम संपूर्ण झाले असून दिनांक 23 फेब्रुवारी व 24 फेब्रुवारी रोजी या विद्युत प्रवाहाची चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर आज घेण्यात आलेल्या चाचणीत प्रत्यक्ष विद्युत प्रवाहावर धावणारे दोन इंजिन रोहा येथून रत्नागिरी येथे पाठविण्यात आले.

आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रोहा स्थानकावर रेल्वे अभियांत्रिकी विभाग, रोहा रेल्वे अधिकारी, इंजिन कर्मचारी इत्यादींनी पुजा करून विद्युत उर्जेवर धावणारे दोन इंजिन रोहा स्थानकापासून रत्नागिरी स्थानकापर्यंत सोडण्यात आले व ते इंजिन अगदी यशस्वी रित्या रत्नागिरी येथे पोहोचले असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. आज घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष चाचणीत विद्युत प्रवाहावर धावणाऱ्या इंजिन मुळे रोहा – रत्नागिरी या मार्गावर ची रेल्वे सेवा ही अधिक जलद धावणार असून ती प्रदूषण मुक्त असणार आहेत.

कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून आजपर्यंत डिझेल या इंधनावर गाड्या धावत आहेत. यामुळे रेल्वेला डिझेल इंधनावर मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. या विद्युत प्रकल्पामुळे कोकण रेल्वे ला डिझेल वरील खर्च वाचणार आहे.
डिझेल मुळे वातावरणात प्रदूषण सुध्दा होत आहे ते थांबणार आहे.

मुंबई – रत्नागिरी या मार्गावर विजेवर धावणाऱ्या फेऱ्या वाढणार आहेत गाड्यांमुळे प्रवाशांना सुध्दा त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.
तसेच भविष्यात या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे उपाययोजना करेल.

Social Media