स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही; अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री

मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा(Kunal Kamra) यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याबद्दल खालच्या दर्जाची कॉमेडी करून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. असे अपमानित करणे चुकीचे आहे. ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेला आदर आहे. त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत स्पष्ट सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वीकार केला जाईल पण या स्वातंत्र्याचा स्वैराचार आणि  दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. राजकीय कॉमेडी करा, व्यंग करा पण प्रसिद्धीसाठी जर कोणी अपमानित करत असेल तर त्याच्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. या विषयावर शिवसेना शिंदेगटाचे नेते अर्जुन खोतकर मंत्री शंभुराज देसाई यांनी तीव्र आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. त्यावेळी सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले त्यांनी घोषणा दिल्याने गदारोळात कामकाज करणे शक्य नसल्याने अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनीटे तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरु होताच मुख्यमंत्र्यांकडून याबाबत कारवाईची घोषणा करण्यात आली.


महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव

Social Media

One thought on “स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही; अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *