‘एनएचएआय’ने(NHAI) ‘फास्टॅग’संदर्भात वाहन चालकांना दिलासा दिला आहे. ज्यांनी अद्याप ‘फास्टॅग’चे ‘ई-केवायसी’ केले नाही त्यांना 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या वाहनचालकांनी ई-केवायसी केले नसेल अशांचे ‘फास्टॅग’ ‘डिएक्टिवेट’ होईल. परिणामी त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.
असे करा अपडेट :
▪️प्रथम fastag.ihmcl.com या संकेतस्थळावर लॉगइन करा.
▪️नोंदणीकृत मोबाईल आणि पासवर्ड टाका.
▪️डॅशबोर्डवर ‘माय प्रोफाईल’वर क्लिक केल्यावर योग्य ती माहिती भरावी लागेल.
▪️त्यानंतर अपडेट झाले की नाही हे कळेल.
अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
▪️वाहन नोंदणी प्रमाणपत्र
▪️फोटो
▪️वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा.