‘लाल सिंग चड्ढा’, ‘KGF2’ आणि ‘रनवे 34’ आणि ‘हिरोपंती 2’ सारखे अनेक बिग बजेट चित्रपट एप्रिलमध्ये होणार प्रदर्शित

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाही..मात्र आता  कोरोनाच्या घटत्या प्रसारामुळे अनेक बॉलिवूड चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहेत. एप्रिल 2022 मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एप्रिलमध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगण, आमिर खान आणि टायगर श्रॉफ यांसारख्या सेलिब्रिटींचे चित्रपट आमनेसामने येणार आहेत.

‘लाल सिंग चड्ढा’, ‘KGF2’ आणि ‘रनवे 34’ आणि ‘हिरोपंती 2’ मध्ये एप्रिलमध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांचे कलेक्शन कमी करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख बदलणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

हे चित्रपट 14 आणि 29 एप्रिलला रिलीज होणार आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये बॉक्स ऑफिसवर बिग बजेट सिनेमे धमाल करणार आहेत. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि यशचा ‘केजीएफ 2’ १४ एप्रिलला रिलीज होणार आहे. अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांचा ‘रनवे 34’ आणि टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’ 29 एप्रिलला रिलीज होणार आहे.

 

Social Media