ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव

बीड : बीड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.

बीड जिल्ह्यात 3 लाख 55 हजार 220 रब्बी पिकाखाली पेरणीचे क्षेत्र आहे.यावर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली आहे.यात जिल्ह्यात 1 लाख 67 हजार हेक्टरवर हरभरा पेरा झाला असून सर्वाधिक पेरा हा अंबाजोगाई तालुक्यात झाला आहे.तर 1 लाख 46 हजार हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे. मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यवर घाटे अळीचा तर ज्वारी पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.

पिकांची चांगली वाढ झाली असली तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि हवामान बदलाचा फटका पिकांना बसत असून हरभऱ्यावर निंबोळी अर्क फवारणी तर ज्वारीवर कीटकनाशक फवारणी करण्याचे आवाहन कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Social Media