मुंबई : नावात काय असते असे म्हटले जाते. भारताची गानकोकिळा लता मंगेशकर(Lata Mangeshkar) या नावाभोवती मात्र काय महिमा होता त्याचा प्रत्यय नेहमी आला. आणि आज त्यांच्या एक्झीट नंतर तो प्रकर्षाने जाणवला देखील मात्र लता मंगेशकर(Lata Mangeshkar) हे दिदींचे खरे नाव नव्हते त्यांचे खरे नाव वेगळेच आहे. हिंदी करमणूक क्षेत्रात येतना त्यांचे नाव नवा बदलेले आणि त्यांनि ते अजरामर सुध्दा कैले त्याविषयी!
लता दिदीचे खरे नाव दुसरेच
दिदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ला मध्यप्रदेशातील इंदौर येथे एका ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक आणि थिएटर कलावंत होते, त्यामुळे लतादिदींना संगिताचे बाळकडु कुटुंबातुनच मिळाले होते. स्वर कोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द गायिका आहेत. लता दिदी यांचे खरे नाव हे दुसरे आहे त्याबद्दल अनेकांना माहिती नाही.
‘भावबंधन’ च्या लतिकावरून झाली ‘लता’
त्यांनी नाव कसे आणि का बदलले हे अनेकांना माहित नाही. त्यांचे खरे नाव हेमा हार्डीकर होते. त्यांच्या वडिलांनी आडनाव बदलून मंगेशकर केले, तर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना लता दिदींचे नाव बदलण्यात आले. “लतीका” हे त्यांच्या वडिलांचे नाटक ‘भाऊ बंधन’मधील एक लोकप्रिय चरित्र आहे. यावरूनच त्यांचे नाव ‘लता’ ठेवण्यात आले. लता दीदींचे वडील पंडित दीनानाथ यांचे आडनाव हर्डीकर होते ते बदलून त्यांनी मंगेशकर केले. ते गोव्यातील मंगेशी येथील रहिवासी होते आणि त्या आधारावर त्यांनी आपले नवीन आडनाव निवडले. लतादीदींच्या जन्माच्या वेळी त्यांचे नाव हेमा होते जे बदलून लता असे ठेवण्यात आले. हे नाव वडील दीनानाथ यांना त्यांच्या ‘भावबंधन’ नाटकातील लतिका या स्त्री पात्राच्या नावावरून पडले.