Lata Mangeshkar : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे छायाचित्र न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकले 

मुंबई : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचे काल (६ फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय गायिका भारतरत्न लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्या  जाण्याने जागतिक स्तरावरही हळहळ  व्यक्त केली जात आहे. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये गानकोकीळा लता मंगेशकर यांचे छायाचित्र झळकले  आहे.

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर होणारे अंत्यसंस्कार रविवारपासून ४३ देशांमध्ये लाईव्ह सुरू झाले होते. यापूर्वी लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे यांचा न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे  दोन्ही गायिक खूश होत्या. त्यानंतर न्यूयॉर्क टाइम्समध्ये(The New York Times) लता मंगेशकर यांचा एक फोटो आला आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारने आज (सोमवार) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

 

Social Media