नाशिक : गानकोकिळा भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिक येथील गोदावरी नदीवरील पवित्र रामकुंडात आज विधीवत अस्थी विसर्जन करण्यात आले.
श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे ज्येष्ठ पुरोहित सतीश शुक्ल आणि मंगेशकर कुटुंबाचे उपाध्ये शांताराम भानोसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अकरा ब्रह्मवृंद आणि अस्थी विसर्जन विधी चे पौरोहित्य केले तर अस्थी विसर्जनाचे विधी आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते झाले यावेळी मंगेशकर कुटुंबीय पैकी आदिनाथ यांची पत्नी तसेच लता मंगेशकर यांच्या भगिनी उषा मंगेशकर तसेच कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.
नाशिक मध्ये गोदावरी तीरावर रामकुंड येथे झालेल्या अस्थि विसर्जनाच्या वेळी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिककर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वच नागरिकांना इच्छा असूनही प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या लता मंगेशकर यांना तिलांजली देणे शक्य नसल्यामुळे नाशिककर नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ उपाध्ये सतीश शुक्ला यांनी तिलांजली देऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विसर्जनाच्यावेळी नाशिक मधील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.