आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट उभे ठाकले आहे , आज सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत अशी जहरी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Leader of opposition Devendra Fadnavis) यांनी केली आहे. राज्य भाजपा कार्यकारिणीची बैठक  मुंबईत झाली त्याचा समारोप करताना ते बोलत होते. या सरकारमध्ये कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण !(Criminalisation of politics!)

राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामी नाही,त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही.
अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा असा इशारा त्यांनी दिला.
अमरावतीत SRP च्या 7 तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाही. आझाद मैदानात जे झाले तो सेम पॅटर्न.पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक नाही. आमचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

विचारांचा नक्षलवाद आता नाही.आता तो दहशतवाद्यांशी निगडित आहे.भाजपचा कार्यकर्ता कधीही दंगल करीत नाही.पण कुणी अंगावर आले तर सोडणार नाही. आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो,पण लांगूलचालन करीत नाही. लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही. असं फडणवीस म्हणाले.

एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सर्व योजना बंद! शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही ! वैधानिक विकास मंडळ बंद ! सिंचन, पाण्याच्या योजना बंद ! शेतकऱ्यांची वीज बंद ! शाळा सुरू केल्या आणि लगेच शाळांच्या वीज कापल्या. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. पण महाराष्ट्र मात्र काहीच करायला तयार नाही. हे म्हणतात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही.मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना. छोटी-छोटी राज्य रडत नाही तर लढतात.महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात.बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GSTचे रडगाणे गातात.

१०० कोटी लसीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी अभिनंदन केले. अर्थव्यवस्था, लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे लसीकरण अतिशय आवश्यक होते. हे सोपे काम नव्हते. पण ते भारताने करून दाखविले.पहिल्या दिवशीपासून कोविडचा सामना करताना नरेंद्र मोदी यांनी दृढता दाखविली.या महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे.  सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे.
जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला

Social Media