जनतेच्या तोंडाला पाने पुसली : चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया; तहान लागल्यावर विहीर खणायचा प्रकार : दरेकरांचे टिकास्त्र

मुंबई, दि. १३ :  मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घोषणेनंतर भाजपच्या नेत्यांनी टिका केली आहे. राज्यात उद्यापासून संचारबंदी जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या फेसबूक लाइव्हमध्ये जाहीर केल्यानंतर विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारने तहान लागल्यावर विहीर खणायचा प्रकार अश्या शब्दात टिका केली आहे. मुख्यमंत्री सारे काही पंतप्रधान आणि केंद्र सरकारकडून अपेक्षीत करत आहेत तर जी काही तुटपूंजी मदत दिल्याचे सांगत आहेत त्या सा-या सध्या सुरू असलेल्या योजना लोकांच्या आहेत. त्यांचेच नंतर द्यायचे पैसे आता पुढे केले आणि बोळवण केली जात आहे. असे दरेकर म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यात टाळेबंदीबाबत चर्चा खूप झाली हे मान्य करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता कृती करायची आहे असे म्हटले हे योग्य  आहे असे म्हणत दरेकर म्हणाले की मात्र सरकारने धाडसाने काही गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याया पुढच्या काळात तरी केल्या पाहीजेत.

जनतेच्या तोंडाला पाने पुसली : चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया(Chandrakant Patil reacts : Leaves wiped in public’s mouth)

राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

घोषणा फसव्या(Announcement fraudulent)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत.

कुटुंबे उध्वस्त होण्याची भीती(Fear of ruining families)

त्यांनी सांगितले की, सर्व काळजी घेऊन शक्य ते उद्योगधंदे चालू ठेवण्यास परवानगी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु, त्यांनी व्यापाराविषयी काहीही उल्लेख केला नाही. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचा आदेश असल्याने त्याचा जबरदस्त फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. खरे तर पुरेशी काळजी घेऊन व्यापाऱ्यांना काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. केवळ निर्बंध लादायचे आणि फारशी मदतही करायची नाही या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे कुटुंबे उध्वस्त होण्याची भीती आहे.

Bjp state president Chandrakant Patil reacted strongly that chief minister Uddhav Thackeray had pretended to help the poor needy class while actually implementing the lockdown in the name of fifteen days of curfew in the state, but in reality the leaves have been wiped in the mouths of the people by making very meagre provisions.

Social Media