एक दिवसाचे अधिवेशन घेऊन एक ठराव करू, वेळ पडल्यास मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानाना भेटू : मराठा आरक्षणावर अजित पवारांचा खुलासा

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा(Supreme Court) आलेला निकाल धक्कादायक असला तरी मराठा समाजाला आरक्षण( Maratha reservation) देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. किंवा आवश्यकता पडल्यास मध्ये एक दिवसाचे अधिवेशन घेऊन एक ठराव करण्यात येईल. वेळ पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणावर दिलेला निर्णय धक्कादायक(Decision on Maratha reservation shocking)

देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी वकिलांची जी फौज ठेवली होती. तीच फौज मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी ठेवण्यात आली होती, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेला निर्णय धक्कादायक आहे असे ते म्हणाले. सरकार आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. किंवा आवश्यकता पडल्यास मध्ये एक दिवसाचे अधिवेशन घेऊन एक ठराव करण्यात येईल. वेळ पडल्यास सर्वपक्षीयांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू, असे पवार यांनी सांगितले.



पंतप्रधान मोदी एकटे करोनाशी लढू शकत नाहीत केंद्र सरकारने करोनासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी : राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ता नबाब मलिक 



लसीकरण पूर्ण न होताच इतर देशांना लसी(Vaccines to other countries without completion of vaccination)

लसीकरणाबाबत केंद्र सरकारच्या कारभारावर टिका करताना ते म्हणाले की रशियाने भारताला कोरोनाची लस दिली आहे. मात्र, त्यांच्या नागरिकांचे लसीकरण केल्यावरच त्यांनी भारताला लस पाठवली. आपण आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण न होताच इतर देशांना लसी पाठवल्या. हा अत्यंत चुकीचा निर्णय होता. ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांना लस देणे गरजेचे आहे.

पुनावालांना भेटून चर्चा करू(Let’s meet Punawala and discuss)

मात्र, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात अडथळा येत आहे. लस नसल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. लसीच्या दरांवरूनही केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारला लस स्वस्तात मिळत आहे. राज्यांना मात्र महागड्या दरात लस मिळत आहे. सीरमचे अदर पूनावाला परदेशात आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या १० ते १२ दिवसात ते भारतात येतील. ते आल्यावर लस आणि लसींच्या दरांबाबत त्यांच्याशी चर्चा करू, असेही पवार म्हणाले.

Although the Supreme Court’s verdict on Maratha reservation is shocking, we are committed to providing reservation to the Maratha community. The monsoon session will be held in July. Or, if necessary, a resolution will be made with a one-day session. Deputy Chief Minister Ajit Pawar has said that he will meet Prime Minister Narendra Modi with an all party delegation led by Chief Minister Uddhav Thackeray if the time comes. Ajit Pawar today reviewed the corona situation in Pune.

Social Media