तुमचे लीप लायनर ड्राय झाले आहे का? असे असेल तर आजच्या या टिप्स खास तुमच्यासाठी…

आपल्या मेकअप बॉक्समधील आणि रोजच्या वापरातील लिप लायनर ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि जेवढी जिव्हाळ्याची तेवढीच ती खूप नाजूक असते.  आपण कितीही काळजीपूर्वक वापरण्याच्या सूचनांचे पालन केले तरी देखील ते फार काळ टिकत नाहीत आणि ते ड्राय होतात. परंतु हे ड्राय लिप लाइनर फेकून देण्याची साधी हिम्मतही आपल्याला होत नाही. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि ड्राय झालेल्या लिप लायनरला कसे रिवाइव्ह करून वापरू शकाल…आणि त्यासाठी कोणते उपाय अवलंबू शकता ते आपण पाहूयात….

  • सर्व प्रथम, पेन्सिल शार्पनर, पेट्रोलियम जेली, ड्राय झालेली लीप लायनर आणि मेणबत्ती घ्या.
  •  ड्राय झालेल्या लीप लायनरला शार्पनरने शार्प करून घ्या.. लाइनरचे कमीतकमी 4 ते 5 थर काढा जेणेकरून कोरडे भाग पूर्णपणे काढून टाकले जातील. पेन्सिल मोडणार नाही याची खात्री करा.
  • जेव्हा पेन्सिलची टीप तीक्ष्ण होते तेव्हा आपल्या बोटाने पेन्सिलची टीप हळूवारपणे फिरवा. असे केल्याने पेन्सिलला नैसर्गिक उष्णता मिळेल आणि त्यातील मॉइस्चराइझ पुन्हा बाहेर येउ शकेल.
  • जर तुमची लिप लाइनर अधिक कोरडी असेल आणि घासल्यानंतरही काम करत नसेल तर मेणबत्तीची मदत घ्या. ते बर्न करा आणि मेणबत्तीच्या ज्योत जवळ एक ते दोन सेकंद ड्राय लीप लाइनरची टीप ठेवा. दोन किंवा तीन वेळा असे करा. हे अत्यंत सावधगिरीने करा अन्यथा लायनर जळून जाण्याची भीती असते.
  • आता शेवटी पेट्रोलियम जेली घ्या. मेकअप ब्रशच्या मदतीने थोडे पेट्रोलियम जेली घ्या आणि ते लिप लाइनरवर लावा. त्यास पेन्सिलच्या टोकावर थोडावेळ सोडा. असे केल्याने, पेन्सिल आवश्यकतेनुसार मॉइश्चरायझर शोषून घेईल.
  • अशा प्रकारे, हायड्रेटेड लाइनर पुन्हा कार्यक्षम होईल आणि त्यातील कोरडेपणा संपेल.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती  सामान्य माहितीवर आधारित आहे. संवाद मीडिया  याची पुष्टी करत नाही. अंमलबजावणीपूर्वी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Tag-Lip Liner

 

 

Social Media