महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट : प्रकाश आंबेडकर

मुंबई : Live updates on Nagpur violence : नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे.”

ॲड. आंबेडकर यांनी हे देखील स्पष्ट केले की, “हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा.”

ॲड. आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

सध्या नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात ॲड. आंबेडकर यांच्या या वक्तव्याने समाजात शांतता आणि संयम राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.


Live updates on Nagpur violence : पुढील आदेशापर्यंत या10 क्षेत्रात कर्फ्यू ,आतापर्यंत 50 लोकांना घेतले ताब्यात 

 

Social Media