शरीराला निरोगी ठेवण्यासाठी यकृताचे तंदूरूस्त असणे आवश्यक!

मुंबई : लिव्हर म्हणजेच यकृत हे आपल्या शरीराच्या महत्वाच्या भागांपैकी एक आहे, म्हणूनच आपण आपल्या यकृताची चांगल्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपले आरोग्य नेहमी चांगले राहील. परंतु यासाठी हे देखील आवश्यक आहे की शरीरातील यकृताचे महत्व आणि त्याला निरोगी ठेवण्याबाबत सर्व काही माहित असणे जरूरी आहे. चला तर मग जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी…

यकृताचे कार्य (Liver function) : यकृत कार्बोहायड्रेट, प्रोटीन (प्रथिने) आणि चरबीच्या चयापचयात महत्त्वाची भूमिका बजावतो. हे पित्त तयार करते, जे पचनासाठी खूप महत्वाचे आहे. हे विशेषतः चरबीच्या अतिरिक्त ग्लूकोज किंवा शुगरला (साखर) आपल्या पेशींमध्ये ग्लुकोजच्या स्वरूपात साठवते. यकृत अमिनो ऍसिड तयार करते, जे प्रोटीन तयार करण्यासाठी आणि संक्रमणास विरोध करण्यासाठी आवश्यक आहे. हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक लोह साठवते. यकृताचे कार्य कोलेस्ट्रॉल आणि इतर रसायने तयार करणे हे देखील आहे. यकृत शरीरात तयार होणाऱ्या अनावश्यक पदार्थांना युरियामध्ये रूपांतरित करते, जे मूत्रमार्गाद्वारे उत्सर्जित होते. हे रक्तातील जीवाणू (bacteria) आणि विषारी पदार्थांना उत्सर्जित करते.

शरीराला फिट ठेवायचे आहे तर यकृताची घ्या अशी काळजी…

  If you want to keep the body fit, take care of the liver…

यकृताशी संबाधित समस्या (Liver problems) : यकृताशी संबधित आजारांना ‘हेपोटिक डिसिज’ असे देखील म्हणतात. यामध्ये यकृताशी संबंधित सर्व समस्यांचा समावेश केला जातो.

यकृताचे मुख्य आजार ( Main liver diseases)

  • हिपॅटायटीस (hepatitis)
  • फॅटी लिव्हर (Fatty Lever)
  • पीलिया (कावीळ) (jaundice)
  • लिव्हर कॅन्सर (Liver Cancer)
  • लिव्हर सिरोसिस (liver cirrhosis)
  • लिव्हर फेलियर (Liver Failure)

 

या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक :

These things need to be addressed

  • अल्कोहोल आणि स्मोकिंग (धुम्रपान)यापासून दूर राहणे.
  •  शरीराच्या मध्यभागी चरबी वाढू देऊ नये.
  • अशा पदार्थांचे सेवन करा ज्यामध्ये फायबर व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्सचे प्रमाण अधिक असेल.
  • वेळोवेळी रक्ताच्या चाचण्या करणे, जेणेकरुन रक्तातील चरबी, कोलेस्ट्रॉल आणि ग्लुकोजची पातळी समजते.

To keep the body fit, it is very important for the liver to be fit and fine. Liver is one of the important parts of our body, so we should take very good care of our liver, so that our health will always be good.

हे सद्धा वाचा…कलाकारांच्याच आश्चर्यकारक प्रतिक्रिया…

अक्षय कुमारचा पहिला स्क्रीन लूक व्हायरल, चाहत्यांकडून होतेय प्रशंसा…

Social Media