‘सत्तातुरांणा न भयं न लज्जा,’ सत्तेच्या साठमारीत सामान्यांचा जीव गुदमरला!

राजकीय विश्लेषण किशोर आपटे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भोवतालच्या व्यक्तिंच्या माध्यमातून चहूबाजूने त्यांच्याभोवती चौकशीचा पाश आवळत चालला आहे. कदाचित या गोष्टीचा अंदाज एव्हाना स्वत: उध्दव ठाकरे यांना आला असावा असे त्यांच्या विधीमंडळात केलेल्या भाषणा नंतर मानले जात आहे. याचे कारण मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर भारतीय जनता पक्षाकडून स्थायी समिती प्रमुख यशवंत जाधव यांच्या वरील छाप्यात सापडलेल्या डायरीत मातोश्रीला दोन कोटी पन्नास लाख दिल्याचा उल्लेख असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत.

एकाच भाषणात आव्हान आणि शरणागती

आयकर विभागाच्या तपासात असे काही असेल याची आपणांस कल्पना नाही मात्र या विषयावर आता चौकशी सुरू आहे त्यात सर्व सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया मग भाहप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी दिली आहे. तर भाजपचे अन्य नेते किरिट सोमैय्या(Kirit Somaiya) यांनी थेट ठाकरेंवर  हल्ला करत मुख्यमंत्री घाबरले आहेत म्हणून मला तुरुंगात टाका असे म्हणत आहेत. असे सांगत मुख्यमंत्र्यावर प्रहार केला आहे. एकंदर मुख्यमंत्र्याचे विधिमंडळातील भाषण शेवटच्या काही तासात विधान भवनातील भाजपच्या आरोप आणि प्रत्यारोपांच्या पार्श्वभुमीवर फार काळ काही प्रभाव टाकू शकले नाही. माझ्या कुटूंबियांची आणि सहकारी शिवसैनिकांची बदनामी करण्यापेक्षा तुमचा राग माझ्यावर आहे तर मी तुमच्या सोबत येतो, मला तुरूंगात टाका असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी एकाच भाषणात आव्हानही दिलेआणि शरणागती देखील दाखवली. त्यामुळे भाजप मध्येच दोन मत प्रवाह आहेत असे सांगण्यात येते. मात्र सध्या भाजपमध्ये सारे काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. त्यामुळे त्या मत प्रवाहांना प्रवाह पतितच व्हावे लागते हा भाग निराळा असे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे मत आहे. असो.

बिर्ला-सहारा-जैन हवाला डायरी

तर मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘त्वमेव शरणं मम’ च्या भावनिक आवाहनानंतर भारतीय जनता पक्षाकडून यशंवत जाधवांच्या डायरीची भिती घातली जात आहे, मात्र शिवसेनेकडून त्याला तश्या पध्दतीने आव्हान दिले जात नाही ते देत आहे कोण कॉंग्रेसचे माजी मुख्य प्रवक्ता सचिन सांवत त्यांनी म्हटले आहे जी डायरीची चौकशी करायची तर बिर्ला सहारा डायरी पासून सुरूवात करा ज्यात मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना बिर्ला समूह आणि सहारा समूहांकडून कथित देणग्या दिल्याचे उल्लेख आहेत. तर डायरीच्या निमित्ताने शिवसेना आता जैन हवाला डायरीचा देखील हवाला देवू शकते ज्यात एल के आद्य अक्षरांचा उल्लेख केला जात होता, त्याकाळात चैतरूप भन्साळी घोटाळा झाला होता, आणि तत्कालिन भाजपचे मंत्री, तसेच खासदार यांची त्यात नावे होती. भाजपचे सधय्चा माजी खासदार किरिट सोमैय्या यांचे देखील त्या प्रकरणाशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जात होते. मात्र नंतर हे प्रकरण मांगे पडले असे सांगण्यात येत आहे. जैन हवाला डायरी प्रकरण त्या काळात गाजले होते मात्र नंतर त्यातून फारसे काही बाहेर आले नाही.

चौकशी आणि कारवाईचा फास आवळला

मात्र आता सारखी रस्त्यावरची राजकीय लढाई त्या काळात फारशी केली जात नव्हती किंवा सोमैय्यांसारखे हात धुवून पाठिमागे लागत कायदेशीर तपास यंत्रणांचे काम राजकीय पुढारी स्वत:च करत नव्हते. त्यामुळे असेल कदाचित त्या प्रकरणांचा माग काढत भाजपचे विरोधक गेले नसावेत. तर सांगायचे तात्पर्य काय? तर बुडत्याचा पाय खोलात याची जाणिव मुख्यमंत्र्याना झाली असावी, किंवा ती करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या राजकीय विरोधकांचा असावा. मात्र ज्या प्रकारे हे सारे घडते आहे त्यातून खुलासे करण्याला वाव नाही अशी हताश प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यानी त्यांच्या भाषणात व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन वर्षापूर्वी ज्या धाडसाने राष्ट्रवादी- कॉंग्रेस सोबत घरोबा केला, त्यानंतर ज्या पध्दतीने आता त्यांच्या दरवाज्यापर्यंत नव्हे त्याच्या नातेवाईकांपर्यंत चौकशी आणि कारवाईचा फास आवळला जात आहे.

नुकसान केवळ महाराष्ट्राच्या सामान्य जनतेचे

ते पाहता निवडणुकांच्या पूर्वी भाजपकडून शिवसेनेला पुरते राजकीय व्दंदात आणि कायदेशीर अडचणीत आणले जाणार असे चित्र दिसते आहे. उध्दव ठाकरे यांना ‘दाती तृण धरून शरण’ आणायची शर्थ त्यासाठी केली जात असावी असे राजकीय निरिक्षक मानतात. त्यामुळे येत्या काळात मुंबइसह अन्य महापालिकेच्या निवडणूकांचे राजकारण जनतेच्या प्रश्नांच्या मुद्यावर लढले जाण्याऐवजी ‘कौन कितने पानी मे’ या  एकाच मुद्यावर लढले जाणार का? त्याचा सामान्य जनतेला काय सेवा सुविधा मिळणार याच्याशी काही संबध असले की नाही हा प्रश्नच आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ता असते हे जणू विसरून सर्वच पक्षांकडून सत्ता केवळ राबविण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी असते असे वातावरण तयार केले जात आहे. त्या संघर्षात सत्तेसाठी पैसा आणि पैश्यासाठी सत्ता इतकाच विषय असतो. आणि ‘सत्तांतुरांणा न भयं न लज्जा’ अश्या प्रकारे सध्या महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठी भाजपसारख्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून कधी संबोधन असलेल्या पक्षांकडून हा खेळ सुरू झाला आहे. कारण त्यांच्यासोबतचा एक पक्ष अन्य पक्षांसोबत गेला. गेल्या अडीच वर्षापासून कोरोनासारखे संकट असताना लोकांचे अक्षम्य प्रश्न असताना निलाजरेपणाने केंद्रातील सत्तेच्या माध्यमांतून दबावाचे कुरघोडीचे जे राजकारण सुरू आहे त्यातून नुकसान केवळ महाराष्ट्राच्या सामान्य जनतेचे झाले आहे. याला जबाबदार सत्ताधारी आणि विरोधीपक्ष दोन्ही  आहेत. मात्र फडणवीस यांनी म्हटल्या प्रमाणे ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, मुंबई नव्हे’ त्यामुळे हे बोलणा-यांना काहीच किंमत नाही. त्यामुळे तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे! असेच अभिप्रेत आहे नाही का?

घोडा मैदान जवळ आहे!

या लेखाचा समारोप करताना युक्रेन रशिया युध्दात (Ukraine Russia War)रशियाला २४ तासांत युध्द जिंकू असे वाटले होते पण झेलन्स्की यांच्याकडून सामान्य जनतेला जे मार्गदर्शन करण्यात आले त्यातून महिना झाला तरी युक्रेनाचा पाडाव करता आला नाही, असे उदागहरण देत शिवसेनेच्या एका लढावू नेत्याने सांगितले की शेवटच्या क्षणी मुख्य नेत्यांने आव्हान देत हिंमत दाखवली तर युध्दाचा निर्णय बदलू शकतो तसे शिवसेनेवर हल्ला करणारांना उत्तर दिले जाईल, कारण ही बाळासाहेबांची लढावू सेना आहे असे सांगितले आहे. हा धृतराष्ट्र नाही महाराष्ट्र आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. पाहूया घोडा मैदान जवळ आहे!


विधिमंडळाच्या चार पाच आठवड्यांच्या अधिवेशनात सामान्य जनतेच्या पदरात काय पडले हा प्रश्न मात्र अनुत्तरीत!

संधीसाधु राज्यकर्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात तरी स्वा. सावरकरांच्या विचारांची, बलिदानाची उपेक्षा थांबवतील का?

World Tuberculosis Day: आज जागतिक क्षयरोग दिन; टीबीशी लढा, काय आहे या वर्षाची थीम…

Social Media