लातूर : उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय व मराठवाडा साहित्य परिषद शाखा उदगीर च्या वतीने घेण्यात येणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बोधचिन्ह ( लोगो ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा खुली असून या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस 5,000/ रुपये, द्वितीय बक्षीस 3,000/रुपये तर तृतीय बक्षीस 2000/ रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आपण तयार केलेले बोधचिन्ह abmss95.udgir@gmail.com या संकेतस्थळावर ( मेल आयडी ) दिनांक 12 डिसेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत.
या स्पर्धेत अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन साहित्य संमेलनासाठी चांगले बोधचिन्ह ( लोगो ) देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, संस्था उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद शाखा उदगीरचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे,प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले आहे.
A logo competition has been organized for the 95th All India Marathi Sahitya Sammelan to be organized by Maharashtra Udaygiri College and Marathwada Sahitya Parishad Branch Udgir of Maharashtra Education Society at Udgir.