ओडीशा : भगवान जगन्नाथ रथ यात्रा १२ जुलैपासून सुरू….

ओडीशा : भगवान जगन्नाथ रथ यात्रा १२ जुलैपासून सुरू झाली आहे. ओडीशामधील पुरी शहरामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा रथामधून जगन्नाथ मंदिरातून गुंडिचा मंदिरात पोहोचतात. जेथे त्यांच्या मावशीचे घर आहे. परंपरेनुसार, तिघेही आठवडाभर येथे विश्राम करतात. रथ यात्रेचा हा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जातो. त्या दरम्यान भगवान जगन्नाथ यांची पुरीमध्ये यात्रा केली जाते. ही रथयात्रा महत्वपूर्ण आहे कारण युनेस्कोच्या वतीने पुरी शहराला वर्ल्ड हेरिटेज च्या यादीत समाविष्ट केले आहे.

जम्मू काश्मीर पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार…. – 

सुर्योदयापूर्वी रथ यात्रेची तयारी सुरू केली आहे. सर्वप्रथम, परमेश्वराला खिचडी अर्पण केली जाते. त्यानंतर रथ सोहळा आणि इतर विधी सुरू होतात. त्यानंतर सेवक, भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती दोऱ्याच्या सहाय्याने रथाकडे आणतात. रथ ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोर्‍या त्या कपड्यांपासून बनवल्या जातात जे कपडे वर्षभर देवतांनी घातलेले असतात. मग तिन्ही रथांची पूजा आणि त्यावर बसलेल्या मूर्तींची सजावट केली जाते. स्थानिक राजघराण्यातील महाराज ‘छोटा पोहरा’ चा विधी करतात. यामध्ये रथ सोन्याच्या झाडूने झाडले जाते.

सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र मानसरोवर तलाव – 

रथ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाची व्यवस्था ओडिशा सरकार करते. ओडिशा च्या दस्पल्ला जंगलातून लाकडे आणली जातात. रथ तयार करण्यासाठी सुमारे 4000 लाकडांची आवश्यकता असते. परंतु यामुळे राज्यात लाकूड व झाडांची संख्या कमी होऊ नये म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम 1999 मध्ये सुरू करण्यात आला. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ नारळाच्या लाकडापासून बनविले जाते. ज्याचे वजन इतर लाकडांपेक्षा हलके असते आणि त्याला खेचणे देखील सोपे असते.

Lord Jagannath Rath Yatra: Best place to visit in July is Puri, where the famous Rath Yatra festival is being celebrated.

Uttarakhand Tourism: उच्च न्यायालयाचा काटेकोरपणा असूनही नैनीताल, मसूरीमध्ये पर्यटकांची गर्दी! –

Uttarakhand Tourism: या विकेंडमध्ये देखील मसुरी आणि नैनीतालमध्ये पर्यटकांची गर्दी

स्पेन पर्यटनाच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित : रेयेस मोरोटो –

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान स्पेन पर्यटनाच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित : रेयेस मोरोटो

Social Media