एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinders)ई-केवायसीच्या(e-KYC) संदर्भात केंद्र सरकारनं महत्त्वाची घोषणा केली आहे. एलपीजी सिलिंडरसाठी eKYC करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
तेल कंपन्यांनी ग्राहकांची बनावट खाती शोधून काढण्यासाठी आणि व्यावसायिक सिलिंडरची फसवी बुकिंग रोखण्यासाठी एलपीजी ग्राहकांना eKYC लागू केलं आहे. संबंधित गॅस एजन्सीमध्ये जाऊन ग्राहकांना ही ईकेवायसी करावी लागणार आहे.
खऱ्याखुऱ्या ग्राहकांनाच एलपीजी सिलिंडर मिळावेत यासाठी ईकेवायसी अनिवार्य केली आहे. एलपीजी सिलिंडर ग्राहक इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम(Hindustan Petroleum) कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या कंपन्यांचे ॲप्स इन्स्टॉल करू शकतात आणि स्वतः ई-केवायसी पूर्ण करू शकतात.