महाविकास आघाडीची २८८ जागांवर पहिल्या टप्प्यातली चर्चा पूर्ण.

मुंबई:  महाविकास आघाडी(Maha Vikas Aghadi )ची  २८८ जागांवर पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण झाली. तिढा असलेल्या जागांवर आता दुसऱ्या टप्प्यात चर्चा होईल. तिढा असलेल्या जागांबाबत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अंंतिम निर्णय घेतला जाईल. त्यासाठी तीनही पक्षांकडून एकत्र सर्व्हे केला जाईल. ३० ते ३५ जागांमध्ये दोन ते तीन पक्ष आग्रही असल्याने यातल्या जागा दुसऱ्या टप्प्यात चर्चेसाठी घेतल्या जातील. काही जागांमध्ये अदलाबदल केला जाणार आहेत. महाविकास आघाडी लवकरच नेत्यांचे दौरे आणि संयुक्त मेळाव्याबद्दल कार्यक्रम जाहीर करणार आहे.
महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi )लवकरच संयुक्त मेळावे आणि नेत्यांच्या दौऱ्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करून विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या  रिंगणात उतरणार आहे. २०१९ ला जिंकलेल्या जागांमध्ये  बहुतांश जागा या त्या पक्षालाच ठेवण्यावर चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती  आहे. काही जागांमध्ये अदलाबदल केला जाणार आहे.  साधारणपणे ३० ते ३५ जागांमध्ये दोन किंवा तीन पक्ष आग्रही असल्याने  यातील जागा दुसऱ्या टप्प्यात  चर्चेसाठी घेणार आहे.  महाविकास आघाडी लवकरच नेत्यांचे दौरे आणि संयुक्त मेळाव्याबद्दल कार्यक्रम जाहीर करणार आहे.
Social Media