कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा…….?

शिवसेना सचिव किरण पावसकर यांची निवडणूक आयोगाकडे मागणी…!
मुंबई : राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीची(Assembly elections) जबाबदारी काँग्रेसने त्यांची सत्ता असलेल्या कर्नाटक(Karnataka) आणि तेलंगणा (Telangana)या शेजारील राज्यातल्या लोकांवर दिली असून येथून शेकडो कोटी रुपये महाराष्ट्रात येतील, खळबळजनक गौप्यस्फोट करत, त्यामुळेच या दोन्ही राज्यांच्या सीमा सील करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी शिवसेना निवडणुक आयोगाकडे(Electoral commissions) करणार असल्याची माहिती शिवसेना सचिव व मुख्य प्रवक्ते किरण पावसकर यांनी  दिली.
बाळासाहेब भवन(Balasaheb Bhavan) या पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेत बोलताना पावसकर म्हणाले की,महाराष्ट्रातील निवडणुकीत पैशांचा खेळ होईल. कारण महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणा या त्यांची सत्ता असलेल्या राज्यातून या निवडणूकीसाठी आधीच पैसा येत असून परदेशातूनही मोठया प्रमाणावर पैसा येत आहे.त्यामुळे या पैशांचीही चौकशी होणे आवश्यकच असून यासाठीच निवडणूक आयोगाकडे निवेदन देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीतही याच दोन राज्यांतून महाराष्ट्रात पैसा आला होता.याचाच फटका महायुतीला बसला होता असा दावा करतानाच त्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करण्याची गरज असल्याची ठाम शक्यताही पावसकर यांनी यावेळी वर्तविली.
पावसकर पुढे म्हणाले की राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी आपले विचार सडेतोड पणाने मांडले.त्यांनी कधी राजकारणाचा, खुर्चीचा,पैशांचा विचार केला नाही. मागच्या निवडणुकीत पुतण्यासाठी वरळीत उमेदवार न देऊन राज ठाकरे यांनी नातं जपलं.मात्र त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे(Amit Thackeray) निवडणुकीत उभे राहिले म्हणून त्याची परतफेड करण्याचे साधं सौजन्य उध्दव ठाकरे यांच्या मध्ये राहू नये ही लाजीरवाणी बाब असल्याचीही पराखड टीका पावसकर यांनी केली. नातं जपलं गेले नाही, नातेवाईक आणि भावांना जपले गेले नाही, मराठी माणसाला जपले गेले नाही,आणि बाळासाहेबांच्या विचारांनाही जपले गेले नाही.कशाचीही फिकीर न करता फक्त खुर्ची आणि खुर्ची आणि मी मुंख्यमंत्री कसा होईन आणि माझा मुलगा मंत्री कसा होईल.मी आणि माझं कुटुंब बाकी सगळे गेले तेल लावत हा एकच प्रकार त्यांच्याकडून सुरु असल्याचा थेट आरोपही पावसकर यांनी उध्दव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) केला.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी अडीच वर्षाच्या आपल्या सत्ताकाळात राज्यात विकासासाठी अगदी झपाटल्यागत काम केले. ते पाहता व त्यांनी सुरू केलेल्या अनेक कल्याणकारी योजनांना जो अभूतपूर्व प्रतिसाद सामान्य जनतेतून मिळतोय ते लक्षात घेता राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल व त्यावेळीही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच असतील, असा प्रबळ विश्वासही पावसकर यांनी व्यक्त केला.
Social Media