पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हाय अलर्ट, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

रेल्वे स्थानकांवर तब्बल ‘इतक्या’ हजार कॅमेऱ्यांची देखरेख

मुंबई  : जम्मू-काश्मीर(Jammu and Kashmir)मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही निगरानी वाढवण्यात आली आहे. तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्याची कारवाई देखील सुरू केली आहे.

तसेच मुंबईतील दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आणि देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीसही सतर्क झाले आहेत. मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांमध्ये आणि परिसरात सुमारे 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी देखरेख ठेवली जात आहे.

शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रणालीद्वारे सतत निरीक्षण केले जात आहे. सीएसएमटी आणि पुणे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत, आरपीएफ, जीआरपीएफ, डॉग स्क्वॉड करडून गस्तीला सुरूवात झाली आहे.

Following the terrorist attack in Pahalgam, Jammu and Kashmir, security measures have been tightened across Maharashtra and the rest of India. CCTV surveillance has been increased at railway stations in Mumbai. Additionally, India has initiated actions to deport Pakistani nationals from the country.

Social Media