Mahindra XUV 3XO : महिंद्रा 29 एप्रिल रोजी भारतात आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO लाँच करणार आहे. या कार मध्ये 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळू शकते. नवीन मॉडेलच्या डिझाईनमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. भारतात महिंद्राची नवीन XUV 3XO कार ही Hyundai Venue, Maruti Brezza, Tata Nexon आणि Kia Sonet शी स्पर्धा करणार आहे.
Skoda Compact SUV : स्कोडा लवकरच भारतात आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. या कारमध्ये 1.0L 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्सने सुसज्ज असेल.
Hyundai Venue : Hyundai Motor India आपल्या कॉम्पॅक्ट SUV Venue चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ही कार लाँच होऊ शकते. या नवीन मॉडेलचे कोड नाव Q2Xi आहे. नवीन मॉडेलच्या डिझाईनपासून त्याच्या इंटीरियरपर्यंत बरेच बदल पाहायला मिळू शकतात.