मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या त्याचे महत्व

आज नवीन वर्षाचा पहिलाच सण मकर सक्रांत(Makar Sankranti) हा आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. पण मकर संक्रांतीच्या सणाचं महत्त्व नेमकं काय आहे हे माहित आहे का?

तर ‘मकर’ (Makar)हा शब्द मकर राशीशी संबंधित आहे, तर ‘संक्रांती’ याचा अर्थ संक्रमण असा आहे. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीत संक्रमण होण्याच्या कारणामुळेच याला ‘मकर संक्रांत’ (Makar Sankranti) असं म्हणतात.

अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला(Makar Sankranti) खिचडी, उत्तरायण, तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी महिला घरी हळदी-कुंकू करतात आणि एकमेकींना वाण देतात. तसेच, या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. नात्यातला गोडवा वाढावा यासाठी या दिवशी एकमेकांना तिळगुळही दिले जातात.

मकर संक्रांतीचा आजचा दिवस शुभ आहे. आज (15 जानेवारी) चंद्र मीन राशीत प्रवेश करणार असून सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे आज मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून चतुर्थ आणि दशम भावात राहणार आहेत, ज्यामुळे आज सूर्य आणि गुरूचा चौथा दशम योग तयार होत आहे. याशिवाय आज चतुर्थ दशम योगासह रवियोग, वरियान योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने मकर संक्रांतीच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

Social Media