मजबूत हाडे(Strong bones) :
तिळाचे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये भरपूर कॅल्शियम(calcium) असते जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. यासोबतच हे लाडू हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यासोबतच हिवाळ्यात सांधेदुखी, गुडघेदुखी सारख्या आजरांपासून सुटका करतात.
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते : Cholesterol levels remain under control:
थंडीमध्ये हृदयाच्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात. यामागचे कारण म्हणजे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात न राहणे. तिळाचे लाडू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची(Cholesterol) पातळी कायम राहते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : Cholesterol Levels Remain Under Control:
तिळाचे लाडू रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास खूप मदत करतात. जर तुम्हाला संसर्ग आणि रोगांपासून सुरक्षित राहायचे असेल,तर तुम्ही हिवाळ्यात तिळ गुळाचे लाडू खाणे महत्वाचे मानले जाते.
दाहक-विरोधी गुणधर्म : Anti-inflammatory properties:
तिळाच्या लाडूमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. मुतखडा आजार असलेल्या लोकांसाठी तीळ गुळाचे लाडू उपयुक्त ठरतात. कारण त्यांना जळजळ होण्याची अधिक शक्यता असते.