मल्लिका शेरावत तिच्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत!

नवी दिल्ली : आपल्या ग्लॅमरस अभिनयामुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मल्लिका शेरावतने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिने ऑडिशन शिवाय कधीच कोणत्या चित्रपटात काम केले नाही. तिने सांगितले की, तिचा अगामी चित्रपट Rk/RKay यासाठी देखील तिने स्क्रीन टेस्ट दिली आहे. मल्लिका शेरावतने असेही सांगितले आहे की, अभिनेता जॅकी चैन ने देखील २००५ मधील चित्रपट ‘द मिथ ‘ मध्ये तिला कास्ट करण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले होते.

मी स्टारकिड्स नाही…( I’m not starkids…)

माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, मी काम मिळविण्यासाठी ऑडीशन दिले आहे. ही प्रक्रिया कायमच होती, परंतु मला असे वाटत नाही की, स्टार किड्ससाठी देखील ही प्रक्रिया फॉलो केली जाईल. मल्लिकाने पुढे सांगितले की, यावेळी जेव्हा रजत ने मला त्याच्या चित्रपटासाठी संपर्क केला, तेव्हा त्याने माझी लूक टेस्ट आणि स्क्रीन टेस्ट केली आणि मला सांगितले होते की जर मी या भूमिकेसाठी फिट नसल्यास मला या चित्रपटात घेतले जाणार नाही. मल्लिका जरी आज तिच्या चित्रपटांसाठी चर्चेत नसली तरी, ती तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी आणि बोल्ड अंदामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी बोलत असते. तसेच ग्लॅमरस फोटोंद्वारे चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडत असते.
Bollywood actress Mallika Sherawat, who is in the limelight due to her glamorous acts, has once again come into the discussion regarding her statement.

कलाकारांच्याच आश्चर्यकारक प्रतिक्रिया…

अक्षय कुमारचा पहिला स्क्रीन लूक व्हायरल, चाहत्यांकडून होतेय प्रशंसा…

Social Media