मंकी बात…

२०२२च्या राज्यसभा निवडणुकीच्या पुनरावृत्तीची शक्यता टळल्याने; सत्ताधा-यांचे राजकीय फासे उलटे का पडू लागले आहेत? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू!

किशोर आपटे

‘मोदी है तो मुमकीन है’ आणि ‘एक अकेला सब पर भारी’ सारखी दर्पोक्तीयुक्त भाषा सत्ताधा-यांकडून केली जात असतानाच २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक अखेर टळली आहे. सहा जागांसाठी सात नामांकन अर्ज दाखल झाले. अर्ज छाननीच्या वेळी जयवंत जगताप या मराठा आंदोलक कार्यकर्ता असलेल्या पुण्याच्या तरूणाचा अर्ज बाद झाल्याने १६ फेब्रुवारीला ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले आणि भाजपच्या मदतीने दोन दिग्गज कॉंग्रेस नेते थेट राजस्यसभेत गेले तर बिनविरोध केल्याचे तिसरे हंडोरे आणि मित्रपक्ष म्हणून जुने कॉंग्रेस नेते प्रफुल्ल पटेल असे चार कॉंग्रेस नेते भाजपच्या कृपेने राज्यसभेत पोचले आहेत.  त्यामुळे राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांकडून सुटकेचा निश्वास टाकण्यात आल्याचे पहायला मिळाले. मात्र सत्ताधारी पक्षाच्या राजकीय रणनितीचे फासे उलटे का पडू लागले आहेत याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कारण या निवडणुकीपूर्वीच मोदी-शहा(Modi-Shah) यांच्या धक्कातंत्राचा परिचय देत कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री माजी प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी कॉंग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी आठ दिवस आधी मिलिंद देवरा(Milind Deora) यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता चौथा उमेदवार म्हणून या दोघापैकी एकासाठी ते कॉंग्रेसच्या किमान ३० – ३५ आमदारांची मते फोडतील अशी चर्चा सुरू झाली होती. तर किमान ३० कॉंग्रेस आमदार चव्हाण यांच्यासाठी राजीनामा देतील असेही नंतर सांगण्यात येत होते.

यावेळी महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये शिवसेना ठाकरे १६(Shiv Sena Thackeray), राष्ट्रवादी शरद पवार १४(Sharad Pawar) आणि कॉंग्रेसची ४४ तर चार अपक्ष अशी ७८ मतांची संख्या होती. मात्र एका राज्यसभा उमेदवाराचा कोटा ४२ असल्याने तसेच त्याला सुरक्षीत करण्यासाठी अधिकची दोन मते धरल्यास उरलेल्या २९ मतांमध्ये दुसरा आघाडीचा उमेदवार जिंकणे शक्य नव्हते. त्या उलट महायुतीमध्ये भाजप १०४ राष्ट्रवादी अजित आणि शिवसेना शिंदे यांच्यासह अपक्ष असे दोनशे पंचवीसच्या आसपास संख्याबळ असल्याने भाजपचे दोन आणि शिंदे पवारांचे प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे विजयी होवून तिस-या उमेदवारासाठी भाजपला काही मते कमी पडत होती तर चौ्थ्यासाठी संपूर्ण कॉंग्रेसची मते फोडण्याची रणनीती होती. मात्र नंतर ते वेगळी राजकीय स्थिती समोर आल्याने शक्य नव्हते. त्यामुळे भाजप पुन्हा झडप घालून २०२२च्या राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची शक्यता टळल्याचे सांगितले जात आहे.

मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी देखील सुरू झाली होती. त्याचवेळी अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांच्यावर मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि नरेंद्र मोदी यांनी(Narendra Modi) जाहीर भाषणात केलेल्या टिका व्हायरल झाल्या, सुप्रिया सुळे, उध्दव ठाकरे, संजय राऊत यांनी या क्लिप जाहीरपणे लोकांना ऐकवल्या. समूह माध्यमांत (सोशल मिडिया) भाजपमधून कॉंग्रेसचे लोक राज्यसभा विधानपरिषदा विधानसभा लोकसभांत सदस्यत्व मिळवतात आणि मुळचे निष्ठावंत सतरंज्या उचलत राहतात अशी टिका टिपणी मिम्स ट्रोलचा पाऊस पडला. त्याची खूप मोठी प्रतिक्रिया भाजपमध्येच उमटल्याने मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) या २०१९मध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासाठी डावलण्यात आलेल्या महिला नेत्यांचे नाव पुढे आले. तर ओबीसी लिंगायत समाजाचा उमेदवार म्हणून गोपछडे यांचे नाव देण्यात आले.  त्याचे कारणही स्पष्टच होते माजी प्रवक्ता आणि उपाध्यक्ष माधव भांडारी(Madhav Bhandari) यांच्या सूपूत्राची चिन्मय भांडारीची एक पोस्ट याचवेळी व्हायरल झाली त्यात त्यानी संघ जनसंघ भाजपच्या निष्ठावंताची मेहनत, सत्ता आल्यानंतर दहा वर्ष पक्षात त्यांना नसलेली जागा यावर जळजळीत भाष्य केले होते. त्यातच मागील वेळी ज्या चंद्रकांत हंडोरे या दलित नेत्याला भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे २०२२च्या विधान परिषदेत घरी पाठविण्यात आले होते त्यांनाच यावेळी कॉंग्रेसने उमेदवारी देत महाविकास आघाडीचा पांठिंबा मिळवला होता. त्यासाठी राष्ट्रवादी ठाकरेंच्या अतिरिक्त तीस मतांची बेगमी केल्याने कॉंग्रेसच्या उमेदवाराला आघाडीचे पाठबळ मिळाले. मात्र त्यांनाचा पुन्हा हरविल्यास भाजपने पुन्हा दलित उमेदवाराचा पराभव केला ही चर्चा (भाजपच्या नेत्यांच्या भाषेत नँरेटिव) लोकसभा महिनाभवारवर आली असताना दलित समाजाचा रोष भाजपकडे जाण्यास कारणीभूत झाली असती. त्यामुळे ऐनवेळी संघाच्या वरिष्ठांनी संघ दक्ष, सावधानऽ असे परेडमधील आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना राष्ट्रवादी पक्षात फोडाफोड करून राज्यात सत्ता मिळविल्यानंतर भाजपच्या नेत्यांना आता लोकसभा तिकीट वाटपात स्वपक्षीय निष्ठावंताना कसा न्याय द्यायचा याचा पेच सतावणार आहेच. त्याची धुसफूस सध्या जागावाटपाच्या चर्चामधून सुरू आहेच, त्यातच आयारामाचा न्याय केला नाहीतर ‘धरले तर चावते सोडले तर पळते’ अशी त्यांची स्थिती होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

याचे कारण ‘जय श्रीराम’चा (Jai Shri Ram)नारा मतांच्या बेगमीसाठी फारसा कामी येत नसल्याचे लक्षात येत असल्याने ‘जब काम न आया जय श्रीराम, तो वापस शुरू हो गये आयाराम! अशी स्थिती झाल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तरेच्या हिंदी भाषिक काऊ बेल्ट राज्यात २०१९मध्ये भाजपला जवळपास पैकीच्या पैकी जागा मिळविण्यात यश आले होते. त्यातून ३०३चा आकडा लोकसभेत साकारला होता मात्र यावेळी त्यापैकी किमान ३७० ची घोषणा देण्यात आली असली तरी बिहार, महाराष्ट्र कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगण या राज्यांत विरोधकांचे बळ वाढले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश राजस्थान गुजरातसह भाजपच्या हक्काच्या राज्यातही प्रस्थापीत विरोधी लाटेचा परिणाम म्हणून किमान ४० ते ५० जागा कमी होण्याची भिती सर्वेक्षणातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोदींच्या तिस-यांदा शपथ घेण्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याने आता आंध्र, तामिळनाडू, बिहार आणि हिमाचल प्रदेश सह संघ, विश्व हिदू परिषदेसह भाजपच्या निष्ठावंताना चुचकारण्यासाठी लालकृष्ण आडवाणी(L.K. Advani), कर्पूरी ठाकूर, चौधरी चरणसिंग, डॉ स्वामिनाथन आणि पी,व्ही नरसिंहराव यांना भारतरत्न(Bharat Ratna) देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच मग महाराष्ट्रात(Maharashtra) अजित पवार(Ajit Pawar) शिंदे अशोक चव्हाण यांना सोबत घेतले जात आहे तर बिहारमध्ये नितीश, उत्तर प्रदेशात मायावती, तेलंगणात केसीआर, उत्तराखंड, हरयाणा, पंजाबमध्ये जयंत चौधरी अमरिंदरसिंग आणि केजरीवालांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र डॉ स्वामीनाथन(Dr. Swaminathan) यांनी पुरस्कार केलेले किमान हमीभाव देण्यासाठी आंदोलन करणा-या शेतक-याचे आंदोलन चिरडले जात आहे, चौधरी चरणसिंग यांना मान णारे जाट पंजाबी शेतकरी त्यात आहेत. जातीगत जनगणनेचा पुरस्कार करणारे कर्पूरी ठाकूर यांना पुरस्कार दिला मात्र जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध आहे. अशी भाजपची परस्पर विसंगत भुमिका आहे. अगदी नरसिंहराव यांच्यावर बाबरी मशिद आंदोलन चिरडल्याचा आरोप त्याचवेळी भाजप हिंदू नेत्यांकडून केला जात होता तर राम रथ यात्रा काढणारे अडवाणी राम मंदिर (Ram Mandir)प्राण प्रतिष्टा कार्यक्रमापासून दूर ठेवले गेले. या गोष्टींचा विरोधकांनी गवगवा केला आहे. महत्वाचे म्हणजे भ्रष्टाचार, घराणे शाहीचा आरोप करणारे मोदी जेंव्हा चरणसिंगांचे नातू जयंत चौधरीना भाजप सोबत घेतात, किंवा शकंरराव चव्हाणांच्या घराणेशाहीचा वारसा घेवून आलेल्या आदर्श घोटाळ्यात आरोपी म्हणून स्वत: टिका केलेल्या अशोक चव्हाणांना सत्तेच्या राजकारणासाठी रेड कार्पेट वागणूक देतात किंवा ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोदी की गँरंटी देत शिक्षा द्यायची भाषा करताना तिस-या दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून सोबत घेतात तेंव्हा भाजपच्या विरोधकांना आणि सुज्ञ मतदार जनतेला ‘कुठे गेली घराणेशाही, भ्रष्टाचाराला दूर करण्याची गँरटी? असा सवाल करत टिकेची उपहासाची आयती संधीच ते मिळवून देताना दिसतात. विरोधाभासातून सत्तेसाठी काहीपण अश्या प्रकारे सत्ताधारी नेते वागत असल्याने ते गोंधळात असून त्यांना जिंकून येण्याचा आत्मविश्वास नसल्याने अन्य पक्षांच्या घराणेशाहीच्या भ्रष्ट नेत्यांना सोबत घेण्याची वेळ या पक्षावर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणूकांची रंगत वाढली आहे. त्यातच आता इलेक्ट्रोल बॉण्ड योजना सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने भरमसाठ पैसा खर्च करून निवडणूकांमध्ये विरोधकांना नामोहरम करणारी सत्ताधारी एनडीए (NDA)अडचणीत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पूर्ण.

Social Media