Beauty Tips : मुरूमे आणि ब्लॅकहेड्सच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी आंब्याचा फेसपॅक उपयुक्त!

 तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना त्वचेसंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात धूळ, प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे मुरूमे येणे (पिंपल्स), ऍक्ने, डाग-धब्बे, टॅनिंग, ब्लॅकहेड्स, अन-इव्हन स्कीनटोन आणि सनबर्ग यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. जर तुम्हाला देखील या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

Beauty-Tips

या सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी घरगुती उपचार खूपच फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. आम्ही तुमच्यासाठी असेच काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही त्वचेसंबंधितील समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

१. तज्ज्ञांचे म्हणणे (What do experts say)- तज्ज्ञांच्या मते, मुरूमे (पिंपल्स), ऍक्ने, डाग-

धब्बे, आणि ब्लॅकहेड्सच्या समस्यांपासून मुक्ती देण्यास आंबा खूप प्रभावी आहे, कारण यात एँटीऑक्सीडंट गुण भरपूर प्रमाणात असतात, यामुळे त्वचेवरील वृद्धत्व कमी होते आणि सुरकुत्या देखील कमी होतात. हे त्वचेला चमकदार बनविण्यासह मऊ आणि कोमल बनवितात.

२. ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी फेसपॅक (Prepare face pack like this to remove blackheads)-

हा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा आंब्याच्या गरात एक चमचा मध, एक चमचा तांदळाचे पीठ आणि एक चमचा दूध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला आणि मानेला लावा. त्यानंतर सुमारे २० मिनिटानंतर हाताच्या सहाय्याने चेहऱ्यावर मसाज करा पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आंब्याचा हा फेसपॅक त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतो, तसेच त्वचेतून मृत पेशी आणि ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास देखील प्रभावी आहे.

३. मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी फेसपॅक (Make face pack like this to get rid of acne)-

मुरूमांच्या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी २ चमचे आंब्याच्या गरात २ चमचे मध, दीड चमचा बदामाचे तेल आणि एक चतुर्थांश चमचा हळद एकत्र मिसळा त्यानंतर हे स्वच्छ चेहऱ्यावर लावा, २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक नियमितरित्या वापरल्याने मुरूमांची समस्या दूर होऊ शकते.

४. तेलकट त्वचेसाठी फेसपॅक (face pack for oily skin)-

हा फेसपॅक बनविण्यासाठी २ चमचा आंब्याच्या गरात एक चमचा मुल्तानी माती, एक चमचा दही आणि एक कप दूध किंवा क्रिम मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर चांगल्याप्रकारे लावा. चेहरा कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्याने त्वचेतील अतिरिक्त तेलाची समस्या दूर होईल.
This face pack prepared from mango will get rid of pimples and blackheads.


Beauty Tips : त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी ‘या’ ४ गोष्टींचा सौंदर्य दिनचर्येत करा समावेश! –

Beauty Tips : सौंदर्याच्या दिनचर्येत ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करून त्वचेची चमक कायम ठेवा!

Social Media