कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

▪️1995 ते 97 च्या दरम्यान माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे(Sunil Kokate) यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यासाठी त्यांनी आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती दिलेली होती.

▪️मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती.

भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : हर्षवर्धन सपकाळ

Social Media