सत्तेच्या सारीपटावर होणार मोठ्या हालचाली! भाजपकडून मोठ्या फेरबदलांची तयारी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकर, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहे. त्याचवेळी उध्दव ठाकरे (UddhavThackeray)यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणे, चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट, पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार(SharadPawar)यांच्या पक्षफुटीबाबतचे खटलेप्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार(AjitPawar)यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेंना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिंदे पवारांना बाजुला तिसऱ्या आघाडीत ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत ना? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मागील सप्ताहात संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात देखील विरोधीपक्षनेते चर्चेत राहिले. संसदेत गेल्या दहा वर्षापासून रिक्त असलेल्या विरोधीपक्ष नेते पदावर राहुल गांधी ( Rahul Gandhi)यांनी आपले … Continue reading मंकी बात…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed