मंकी बात…

‘करलो मुठ्ठीमे’ म्हणून आजोबाच सांगून गेले आहेत ना? तसेच त्यांनी केले!

भारत-जोडो

साधा पंचा आणि उपरणे घेवून लढणा-या गांधींच्या देशात एक गांधी(Gandhi) किळसावाण्या संपत्तीच्या बडेजावापासून दूर राहिला, त्याने गांधीचा वारसा जपला!गंमत म्हणजे देशात पूर्वोत्तर राज्यात यादवी युध्दासारखी स्थिती आहे पण तिथल्या स्थितीवर ज्यांनी लक्ष द्यायला हवे ते केंद्रातील नेते पहायला तयार नाहीत मग तिकडे जायची तर गोष्टच दूर.राहुल गांधी(Rahul Gandhi) वर्षभरात दोनदा मणिपूरला(Manipur) गेले. दोन्ही समाजाच्या लोकांना भेटले मैतेई आणि कुकी(Maitei and Kuki) यांना शांततेचे आवाहन त्यांनी केले. दु:खीतांची विचारपूस केली. जे काम सरकारने करायला हवे. देशात अनेक दुर्घटना झाल्या तिथे राहुल गांधी (Rahul Gandhi) पोचले आपतग्रस्तांना धीर दिला. संकटाच्या क्षणी सोबतीचा विश्वास दिला. पण सत्ताधिशांकडून नेमके उलट वागणे का दिसले?गोदी मिडीया हे विचारणार नाही. अंधभक्त तर ऐकूनही घेत नाहीत. पण देशातील सुजाण तरुण नागरिकांना याकडे उघडा डोळे बघा नीट असे सांगायची हीच तर वेळ आहे नाही का?

नरेंद्र-मोदी

‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी एक म्हण आहे, मुंबईत १३जुलै रोजी असाच एक अब्दुल्ला दिवाना दिल्लीतून एका शाही विवाहात उपस्थित राहण्यासाठी उपस्थित होता म्हणे? सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना लग्नाचे कोणतेही निमंत्रण दिले नव्हते, मात्र मुंबईत ३० हजारकोटींच्या विकास कामांच्या भुमीपूजनाचे निमित्त करून ते लगीन घाईने मुंबईत आले. तर दुसरीकडे दहा जनपथ येथे जावून सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांना मात्र आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. तरीही त्या कुटूंबाचे मात्र कुणी या शाही विवाहासाठी उपस्थित राहिले नाही.

मित्रो, हे कुणाला सांगायची गरज नाही की, गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोन धन्नासेठांसाठी सारे सरकारी चोचले पुरवून त्यांना पोसणा-या योजना राबविण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणूक(Lok Sabha elections) प्रचारात त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्याकडचा काळा पैसा टेम्पोमधून कॉंग्रेसला दिला गेल्याचा संशय व्यक्त केला होता.

मात्र त्यापूर्वी रशियातून कच्चेतेल जगाचे निर्बध असताना चढ्या दराने विकत घेवून अब्जो रूपयांचा फायदा त्यांना मिळवून देण्यासाठी देशाची प्रतिमा खराब होण्याची चिंता न करता सारे सरकार त्यांच्या मनाप्रमाणे वागले. त्यात सामान्य जनतेच्या डोक्यावर इंधन दरवाढ(Fuel price hike) थोपवून त्या दोन गुजराती धन्नाशेठांचा फायदा करून देण्यात आला. त्यांच्या घरच्या लग्नाला आमंत्रण नसताना जावून वधू वरांच्या मध्ये उभे राहून आपला फोटो काढून घेणारे हे महान नेते आहेत. कोळसा खाणी त्यांच्या ताब्यात देवून देशाचे ऊर्जाक्षेत्र पूर्णत: आंदण देण्यात आले आहे. शेअर बाजारात त्यांच्या फायद्यासाठी खरेदी विक्री केली जाते. मग बाजार त्यांना हवा तेंव्हा पाडला जातो, प्रत्येकवेळी सर्वत्र गेल्या दहा वर्षांपासून जनतेला वेठीस धरून त्यांच्या तिजो-या भरण्यासाठी सरकार काम करते.

 

Adani-Ambani

मग अगदी सारे राजकीय नेते उपराष्ट्रपती पासून अनेक राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पाच हजार कोटी खर्चून केलेल्या शाही लग्नाला आवर्जून हजर राहिले नाहीत तरच नवल. आणि त्यापूर्वी या लग्नाचे वेगवेगळे विधी वेगवेगळ्या ठिकाणी झाले त्यातही ही मंडळी झाडून हजर होती म्हणे. त्यांच्या हवाई प्रवासापासून निवासासाठी हजारोकोटी रूपये खर्च करण्यात आले. अगदी क्रुझपासून चार्टर्ड प्लेन पर्यंत सप्त तारांकित बडेजाव करण्यात आला होता. त्या लग्नाचा इतका बोलबाला झाला पण इडी इन्कम टँक्स किंवा अन्य यंत्रणांनी एवढा बडेजाव कश्यासाठी कुणाच्या पैशाने केला म्हणून चौकशी करणे सोडाच राज्याचे सारे पोलीस प्रशासन यंत्रणा त्यांच्या लग्नातील नियोजनासाठी कामाला लागली होती म्हणे! हेच लग्न विरोधीपक्षाच्या एखाद्या नेत्याच्या मुलाचे असते तर ईडी(ED) सीबीआयने(CBI) त्यांच्या चौकश्या सुरु केल्या असत्या आणि वृत्तपत्र माध्यमांनी रसभरीत बातम्याही चालविल्या असत्या. पण हे लग्न होते लालासेठच्या लाडक्या शेंडेफळाचे मग काय? हा देश त्यांच्या आजोबांनीच करलो मुठ्ठीमे म्हणून सांगून गेले आहेत ना? तसेच त्यांनी केले आहे.

आपण मात्र त्यांच्या मक्तेदारी भांडवलशाही सरंजामाची डोळे फोडून बातमी पहायची आणि बघतच रहायचे आहे. कारण हा देश नव्याने त्यांचा गुलाम होण्याच्या मार्गावर आहे. देशाच्या जनतेने ज्या सरकारला निवडून दिले आहे ते सरकारच क्रोनी कॅपीटलीस्ट (Crony capitalist)भांडवलशहांचे गुलाम झाले आहे मग देशाच्या जनतेला त्यांनी कितीही लुटून अमाप संपत्ती जमवली आणि ती अश्याप्रकारे गलिच्छ प्रदर्शन करून उधळली तरी त्याचे कौतूक होत राहणार. बॅरिस्टर होवूनही साधा पंचा आणि उपरणे घेवून सामान्यांसाठी लढणा-या गांधींच्या देशात मात्र एक गांधी अजूनही या सा-या किळसावाण्या संपत्तीच्या बडेजावापासून दूर राहिला त्याने आपला गांधीचा वारसा जपला, तूर्तास इतकेच!

 

किशोर आपटे

(राजकीय विश्लेषक)

 

मंकी बात…

 

मंकी बात…

Social Media