मंकी बात…

शहामृगाने मातीत डोके खूपसले तरी वास्तव टळण्याची शक्यता नसते!

दैव, नशिब, नियती, प्राक्तन, कर्म, किंवा ग्रहस्थिती अथवा वाईट दिवस काहीही म्हणा. पण मंडळी सध्या देशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनतापक्ष (Bharatiya Janata Party)आणि राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीसाठी उजाडणारा प्रत्येक दिवस नवीन अडचणी समस्या आणि संकटे घेवून उगवताना दिसत आहे. लोकसभेत(Lok Sabha) महायुतीच्या पक्षांनी जंगजंग पछाडले तरी खूपकाही चांगली कामगिरी करता आली नाही. पण तरीही ‘नाक कापलं भोक उरलं’ अश्या थाटात या पक्षांच्या नेत्यांकडून राणा भिमदेवी थाटात गर्जना काही थांबायचे नाव घेताना दिसत नाहीत.

Mantralaya
त्यातच ज्योतिष, मंत्र-तंत्र, जादू-करणी यावर प्रचंड वेळ देवून विश्वास ठेवणारे काही प्रमुख नेते संख्य़ाज्योतिषाच्या सांगण्यावरून १५ च्या फे-यात सापडले आहेत म्हणे! या माहितीनुसार महिलांना १५०० रूपये ओवाळणी दरमहा पाठवून त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजना नीट सुरू आहेत की नाही हे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्याकडून १५ कुटूंबाना भेट देवून विचारपूस केली जात आहे! तर जागावाटपामध्येही भारतीय जनता पक्षाला १५० जागा हव्याच आहेत! बहुदा निवडणूकांची घोषणा आणि मतदान देखील १५ तारखेलाच होण्याची शक्यता आता काही चाणाक्ष राजकीय पंडित वर्तवू लागले आहेत. पण हे सारे असले तरी ‘खेळ कुणाला दैवाचा चुकला’‘दैवयोग ना कधी कुणा टळला’ या गाण्याच्या पंक्तीप्रमाणे भाजप आणि मित्रपक्षांच्या मागे दुर्दैवी घटनांच्या मागून येणा-या संकटांची जणू रांगच लागल्याचे गेल्या काही दिवसांत पहायला मिळत आहे.

Maharashtra

तसे तर या सरकारच्या स्थापनेनंतर अश्या ब-याच अनाकलनीय अपघात आणि दुर्दैवी घटना घडल्या ज्यांचा थेट सरकारशी संबंध आहे. मात्र रेटून नेण्याचे कौशल्य असल्याने प्रत्येकवेळी सरकारकडून अश्या गोष्टींवर पांघरूण घालत पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता असे म्हटले म्हणजे काही सत्ताधारी समर्थक लोकांना वाईट वाटते. नेहमी सरकारी पक्षांच्या वाईटसाईट गोष्टींच का लिहिता असा भाबडा प्रश्न त्यांना पडतो. पण राजा नागवा आहे आणि तो कसा चूकीचा वागत आहे हेच दाखवण्य़ाचे मुख्य काम माध्यम आणि जागृत पत्रकारीतेमध्ये करायचे असते. त्यामुळे हा आपदधर्म ओळखून काय झाले नाही? कसे चूकीचे झाले आणि का चूक झाले याची मिमांसा पत्रकारांना करावी लागते त्यामुळे सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सरकारला जाग येते. किंवा सत्ताधारी निरंकुश होत नाहीत. आणि सरकारला आपल्या चूका दुरूस्तीची संधी देखील मिळत असते. हेच जागरूक लोकशाही व्यवस्थेत अपेक्षीत असते. असो.

news-paper

 

अगदी सुरूवातीपासून पाहिले तर जून २०२२ मध्ये उध्दव ठाकरेंचे(Uddhav Thackeray) सरकार उलथवून टाकल्यानंतर पहिले चाळीस दिवस फडणवीस(Fadnavis) आणि शिंदे(Shinde) दोघांचेच सरकार होते आणि मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता त्यावर खूप टिका झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या सहा नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आणि १८ जणांचे छोटेखानी मंत्रिमंडळ वर्षभर काम करत राहिले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या नव्या नव्या तारखा जाहीर होत राहिल्या मात्र तो झाला तर नाहीच पण नंतर चेष्टेचा विषय झाला. एवढे करून या सरकारमध्ये राज्यमंत्रीच नसल्याने अधिवेशनात मुख्यमंत्र्याची सर्व खाती त्यांच्या पाच सहा मंत्र्याकडे सोपवून मुख्यमंत्री सभागृहात कोणत्याही लक्षवेधी, प्रश्नोत्तर, चर्चांना हजर न राहण्याचा नवा चुकीचा पायंडा सुरू झाला. मुख्यमंत्री हजर राहिले तर त्यांनी नेहमी राजकीय भाषणे (Political speeches)केली आणि चर्चांमध्ये मांडलेल्या मुद्द्यांवर फारच कमीवेळा उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर सामान्य लोकांना यातील काही कळत नाही ते सरळधोपट नजरेतून पाहतात असे एका हितचिंतकाने सांगितले.

Appasaheb- Dharmadhikari

चला सरळधोपट पाहूया. मुख्यमंत्र्याचे आध्यात्मिक गुरू आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार(Maharashtra Bhushan Award) देण्यासाठी खारघर येथे भर उन्हातान्हात कार्यक्रम झाला. असे म्हणतात की, वामनराव पै यांना हा पुरस्कार द्यावा असा भाजपच्या काही नेत्यांचा आग्रह असतानाही हा पुरस्कार पुन्हा एकदा धर्माधिकारी कुटूंबात देण्यात आला. त्यावेळी लाखो भाविकांना अन्न पाण्यावाचून ताटकळत ठेवण्यात आले. अमित शहा(Amit Shah) यांच्यासमोर राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात तेथे दुर्घटना झाली त्यात नेमके किती श्री सदस्य उष्माघाताने देवाघरी गेले त्याचा आकडा समोर आलाच नाही. मात्र शासनाची बेफिकीरी समोर आली. या घटनेची ना चौकशी झाली ना दोषी सापडले ना शिक्षा झाली.

त्यानंतर अश्या अनेक घटनांची मालिकाच घडताना दिसली राज्यात कायदा(Law) आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. अगदी हिट एन्ड रनच्या(Hit-and-run) प्रकरण असो, बोगस आयएएस अधिकारी ((IAS officer)प्रकरण असो, पेपरलिक भरती घोटाळ्याचे किंवा आरक्षण (reservation)आंदोलनाचे प्रश्न असोत सरकारकडून त्या प्रश्नांची हाताळणी योग्य पध्दतीने झाली नसल्याचे सत्ताधारी पक्षांचे लोकच बोलू लागले आहेत. एकमेकांच्या पक्षांना नेत्यांना उणेदुणे बोलायची तर या सरकारच्या घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागल्याचे चित्र त्यातून निर्माण झाले. त्यानंतरही राज्यात अनेक संकटे आली. पूर. अतिवृष्टी, अवकाळी मात्र शेतक-यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार उत्सुक दिसले नाही,

Ajit-Pawar

जुलै २०२३मध्ये तर काही गरज नसताना राष्ट्रवादीचे अजीत पवार(Ajit Pawar) आणि त्यांच्या दहा नेत्यांना आणि नंतर चाळीस आमदारांना ‘लांडगा आले रे’ अशी हाकाटी करत पक्ष सोडायला भाग पाडण्यात आले. ज्या अजित पवारांना कंटाळून शिवसेना(Shiv Sena) सोडून आलो असे शिंदे सेनेचे नेते सांगत होते त्यांना आता पवारांचे नेतृत्व मान्य करावे लागले. त्या नंतरही सत्तेच्या बळावर दोन्ही पक्षाना चिन्ह आणि नाव देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) न्यायाला विलंब लावण्यात आलाच अजूनही पक्षफूटीच्या या प्रकरणात योग्य न्याय झाला नाहीच. हे काही बरे झाले नाही अशी मात्र सामान्य मराठी मतदारांची भावना आहे आणि ती लोकसभेत दिसली त्यापेक्षा ठळकपणे विधानसभेत दिसण्याची शक्यता आहे. हीच तर खरी सत्ताधा-यांची भिती आहे.

त्यानंतरही या त्रांगड्या महायुतीमध्ये धुसफूस होतच राहिली. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी अश्या दोन मराठी माणसांच्या पक्षांत फूट पाडायची कल्पना गुजरातमध्ये बसलेल्या काही वरिष्ठ नेत्यांची होती, जेणे करून महाराष्ट्राची लूट करताना मराठी माणसाचा आवाज उठवणारे पक्षच अस्तित्वात राहू नयेत असा प्रयत्न होता. त्यामुळेच मनसे सारखे पक्ष देखील कच्छपी लावण्याचा प्रकार झाला. असे आता उघडपणे सांगण्यात येत आहे.

पण ‘जे पेराल तेच उगवते’ या न्यायाने लोकसभा निवडणूकीत(Lok Sabha elections) या सत्ताधारी महायुतीला महाराष्ट्राच्या सामान्य मतदारांनी नाकारले आणि तीसपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यानंतर बिथरलेले महाशक्तीचे नेते आता निवडणूका(elections) लांबविण्याचा आणि घसरण थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र नियती आपला न्याय करत असते. राज्यात बदलापूर (Badlapur)येथे अजाण बालिकांवर अत्याचाराचा प्रसंग समोर आला दुर्देवाने त्यात संघाशी आणि सत्ताधारी पक्षांशी संबंधिताची शिक्षणसंस्था असल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा नोंदवायचा सोडून दडवादडवी आणि दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला, त्यातून जनक्षोभ उसळल्यानंतर सरकारची प्रतिमा तर डागाळलीच शिवाय सत्ताधारी पक्षांचे खरे चेहरे जनतेच्या समोर आले. ही घटना आटोपते नाही तोच मालवण येथे कधीनव्हे तो छत्रपती शिवरायांचा नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) हस्ते केवळ आठ महिन्यांपूर्वी लावलेला पुतळा पडला. या घटनेतही सरकारकडून शिल्पकार, कंत्राटदारांना पाठिशी घालण्यात आणि जणू फार काही घडलेच नाही असे सांगत उडवाउडवी आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विरोधकांना आयते विषय तर मिळालेच पण सत्ताधारी राज्यकर्ते म्हणून किती अयोग्य आणि नालायक आहेत हे पुन्हा अधोरेखीत झाले. अगदी कधी नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना या प्रकरणात माफी मागावी लागली तरी अजूनही पुतळा पडल्याप्रकरणी आपल्या बगलबच्च्यांना वाचविण्याचा आणि त्यायोगे झालेला भ्रष्टाचार लपविण्याचा अटोकाट प्रयत्न सत्ताधारी करताना दिसत आहेत.

Monkey-baat

हे सारे होत असताना निवडणूक लांबवून सामान्य गरीब जनतेला अमिष दाखवून, भाबड्या गृहिणी, महिलांना आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली मते घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा अनुत्पादक बाबींवर वारेमाप खर्च करून दौलतजादा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अगदी होमगार्डच्या मानधनासाठी, सामान्यांच्या अनेक योजना, विभांगाची तरतूद कमी करून सारा पैसा या सवंग योजनांमध्ये ओतला जात आहे. जेणेकरून सरकारी पैश्यातूनच पुन्हा सत्तासंपादानाचा मार्ग प्रशस्त होण्यास मदत मिळावी असा हेतू आहे. मात्र दैवांची साथ येथे देखील मिळण्याची शक्यता नाही. कारण या योजनेतील गैरप्रकार आता हळुहळू समोर येत असून लाडक्या बहिणींच्या नावावर कसे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचे उखळ पांढरे करण्याचा गोरखधंदा सुरू आहे ते समोर येवू लागले आहे.

 

Chandrashekhar- Bawankule

हे सारे कमी होते की काय, म्हणून आता पुणे, मुंबई नंतर नागपूरात (Nagpur)चक्क भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या मद्यधुंद गाडी चालविण्यातून अपघात घडल्याचे हिट अँन्ड रन(Hits and run) प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण देखील दडपून टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी करताना दिसत आहेत. पुन्हा भाजपच्या नेत्यांची नियतीने अडचण केली आहे. यातून हे नेते आतातरी काही ‘शहा-ण-पण’ शिकणार आहेत की नाही? असा प्रश्न सामान्य भाबड्या महाराष्ट्रात विचारला जात आहे.

 

Sharad-Pawar

दुसरीकडे निवडणूक सर्वेक्षणांचे एकामागे एक विविध अहवाल समोर येत असून त्यात सत्ताधारी भाजपच्या संख्याबळाच्या निम्मे आमदारही पुढच्यावेळी जिंकू शकत नसल्याचा अहवाल वारंवार येत आहे. अगदी संघप्रणित सर्वेक्षण अहवालात(Survey report) देखील हीच स्थिती असून मित्रपक्ष शिंदे यांना १२ ते १५ अजित पवार (Ajit Pawar)यांना ७ ते दहा आणि भाजपला ६० ते ६२ पेक्षा जास्त जागा मिळत नसल्याचा अहवालाने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. नशिबाचे फासे उलटे पडू लागले तर कसे होते याचे हे उदाहरण म्हणायला हवे. आकाशच फाटले तर ठिगळ तरी कुठे कसे आणि कुणी लावायचे? असा हा प्रश्न आहे.

त्यातच आता नविन माहिती समोर आली आहे. संघ परिवाराच्या रेट्यामुळे हरियाणा(Haryana) आणि जम्मू काश्मीरमध्ये(Jammu and Kashmir) केवळ निवडणूक (election)जाहीर केल्यानंतर आता हरियाणात भाजप सपाटून मार खाण्याचे अहवाल समोर येत आहेत. त्यामुळे आता तेथे प्रचार साहित्यातून नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची छबी गायब झाली आहे. हरियाणात निवडणूक होत असताना तेथे जायचे टाळून मोदी विदेश दौ-यात व्यस्त राहिले आहेत.

तर याच स्तंभात महिन्याभरापूर्वी भाकीत केल्यानुसार महाराष्ट्रात देखील शरद पवार (Sharad Pawar)यांनी जुना हिशेब चुकता करण्याची मोहिम सुरू केली असून सुमारे ४० ते ५० भाजपचे बडे नेते त्यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. येत्या निवडणूकीत हे नेते आता भाजप सोडून पवार आणि महायुती सोबत जाण्यास सुरूवात झाली असून वातावरण त्यामुळे आणखी सत्ताधारी विरोधी होण्यास सुरुवात झाली आहे. हे वास्तव असूनही अंधभक्तांना मात्र काहीतरी चांगले घडेल अणि पुन्हा महायुतीचे राज्य येईल अशी आशा वाटणे अयोग्य आहे असे कसे बरे म्हणता येईल. मात्र वादळाकडे पाठ फिरवून शहामृगाने मातीत डोके खूपसले तरी वास्तव टळण्याची शक्यता नसते तसेच हे आहे नाही का? तूर्तास इतकुचे!

 

किशोर आपटे

(राजकीय विश्लेषक)

 

मंकी बात…

मंकी बात…

मंकी बात…

Social Media