मंकी बात

सध्याच्या नकारात्मक वातावरणाला बदलाची ‘चा. .‘हूल’ देणारा आश्वासक आठवडा?

सात नोव्हेंबर २०२२ ला सुरु झालेल्या सप्ताहात देशात ब-याच सकारात्मक घटनाची मालिका घडल्याचे जाणवले. या सा-या घटनांचा तसा एकमेकांशी काही संबंध असण्याचे कारण नाही, किंबहुना हा संबंध कसा आहे हे सांगायला कुणी गेले तरी फारसे कुणाला ते पटेल की नाही हा सुध्दा प्रश्न आहेच. असो, पण विचारांच्या आणि भुमिकांच न घेण्याच्या वैचारीक दुष्काळी वाळवंटात हे अश्या गोष्टी कुणाला तरी जुळवून सांगायचे म्हणजे मृगजळ का होईना हिरवळ असल्याचा आभास तर होत राहतोच की नाही? तर. .  सात तारखेला सुरू झालेल्या सोमवार पासून १२ तारखेला शनिवार पर्यत देशाच्या सध्याच्या नकारात्मक वातावरणाला बदलाची चाहूल देणारा आश्वासक आठवडा म्हटले तरी वावगे वाटायचे कारण नाही.

देशाचे पन्नासावे सरन्यायाधिश म्हणून महाराष्ट्राचे सुपूत्र उच्च विद्याविभुषित न्या धनंजय यशवंतराव चंद्रचूड यांनी पदभार स्विकारला. त्यांच्या शपथग्रहण कार्यक्रमानंतर चंद्रचूड(Chandrachud) यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)दावे दाखल झाल्यानंतर ते सुनावणी साठी येण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा राबविण्याचा अभिनव निर्णय घेतला आहे. म्हणजे आयत्यावेळी दावे सुनावणीच्या प्रक्रियेतून गायब होण्याची शक्यता ९५ टक्के कमी झाली आहे. त्यानंतरही असाधारण स्थिती असेल तेंव्हा त्यातून मार्ग काढायचा असेल तर आम्ही आहोतच असे आश्वासक वक्तव्य चंद्रचूड यांनी केल्याचे माध्यमातील वृत्तात म्हटले आहे.  मित्रहो पण देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात सुवर्ण महोत्सवी कारकिर्द सुरू करणा-या सरन्यायाधिशांच्या शपथग्रहण समारंभात कर्मधर्म संयोग म्हणा किंवा योगायोग म्हणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) साहेब मात्र कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. असो.

नेमके त्याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयात तेलंगण(Telangana) येथे आमदारांना अमिष देवून सरकार पाडण्याच्या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांनी आम्ही त्या चित्रफिती पाहिल्या आहेत, या देशात भ्रष्ट लोकांकडून बेजबाबदारपणे काय सुरू आहे ते लपून राहिले नाही असे खडे बोल सुनावल्याचे वृत्त देखील अनेकांच्या वाचनात आले असेल.

सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईत ९ नोव्हे रोजी सामना चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीच्या कथित हवाला प्रकरणात आश्चर्यकारकपणे १०२ दिवसांनंतर जामिन मंजूर झाला, इतकेच नाहीतर हा जामिन मंजूर करताना विशेष पीएमएलए (प्रिवेंशन ऑफ मनिलॉण्ड्रिग ऍक्ट) (Prevention of Money Laundering Act)न्यायालयाचे न्यायाधिश न्या. एम. जी. देशपांडे (M G Deshpande)यांनी जो १२२पानी निकाल दिला आहे, त्यात इडीने(ED) केवळ निवडक निर्दोष लोकांना दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणात हवाला प्रकरणाची कलमे वापरून विनाकारण अटक केल्याचे म्हटले आहे. अश्या प्रकारच्या कारवाईला जामिन नाकारला तर न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास राहणार नाही, अश्या परखड शब्दात जामिनासह इडीला फटकारले आहे. इतकेच नाही तर नंतर या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी काही काळ स्थगिती देण्याची इडीची विनंती देखील न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर लगबगीने ईडीच्या अधिका-यांनीउच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे न्यायमुर्तीच्या दालनात शेवटच्या मिनीटापर्यंत जामिनाला स्थगिती मिळावी यासाठी प्रकरण दाखल करून घेत आदेश करावा असा  आग्रह करण्यात आला मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणात घाईने स्थगिती देण्यास नकार देत सुनावणी दुस-या दिवशी ठेवली, त्यांनतरही ही सुनावणी तिस-या दिवशी घेण्यात आली त्यावेळी बचावपक्षाच्या वकिलांना त्यांचे म्हण णे मांडायला पुरेसा वेळ देण्यासाठी सुनावणी २५ नोव्हेंबर पर्यत स्थगित करण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयात इडीने दावा केला की राऊत यांच्या जामिन निकालातील मुद्यांचा प्रतिकूल परिणाम होण्याची सक्यता आहे. केवळ सर्वोच्च स्थानी आश्वासक व्यक्तिमत्वाच्या नियुक्तीनंतर न्यायाव्यवस्थेमध्ये जो काही सकारात्मक संदेश गेला आहे आणि त्यामुळे जे सकारात्मक बदल दिसू लागले आहेत असे सुरूवातीला म्हटले त्यांची ही काही निवडक उदाहरणे म्हणता येतील का?

तिकडे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेची मुलूख मैदान तोफ संजय राऊतांचे(Sanjay Raut) जोरदार स्वागत झाले, त्यानी ‘लो मै आ गया’ अश्या फिल्मी स्टाईलमध्ये मला अटक करून विरोधकांनी खूप मोठी चूक केल्याचा त्यांना पश्चाताप होणार आहे असे म्हटले. आता १०२ आमदार शिवसेनेचे निवडून येणार असेही म्हटले. मात्र दुस-याच दिवशी त्यांचा सूर (निरागस हो) मवाळ झाला!. राजकारण करताना व्यक्तिगत व्देष, आकस आणि सुडाचे राजकारण, कटुता नको असे म्हणत खासदार, पत्रकार म्हणून आपण जनतेची, पक्षाची भुमिका मांडली. त्यामुळे तुरुंगात जावे लागत असेल तर अश्या वृत्तीची तक्रार देशाचे राज्याचे गृहमंत्री आणि पंतप्रधान यांना भेटून करणार असल्याचे त्यांनी म्हटले. अश्या बाबतीत सध्या देशात मोदी शहा(Modi Shah) या नेतृत्वा कडून कलम ३७०  रद्द करण्याच्या निर्णया प्रमाणे धडाकेबाज निर्णय घेण्याची राऊत साहेबांची अपेक्षा योग्यच म्हणायला हवी. कारण या देशात लोकशाही टिकली पाहीजे, कुणी विरोधात बोलतो, लिहितो म्हणून त्यांचा आवाज  बेकायदेशीरपणे खोट्या गुन्ह्यात अडकवून करता कामा नये असे राऊत साहेब म्हणाले. ते त्याचमुळे हा सकारात्मक बदल मित्रहो, याच सप्ताहात पहायला मिळाला.

BHARAT JODO YATRA

तिकडे राहूल गांधी(Rahul Gandhi) सुध्दा नेमके याच सप्ताहात महाराष्ट्रात नांदेड(Nanded) मधून प्रवेश करते झाले. त्यांनी ‘नफरत छोडो. .  भा (रत) जप  जोडो’ असे म्हटले की काय? असे वाटावे अशी वक्तव्ये नेमकी त्याचवेळी संजय राऊत यांच्याकडून इकडे सुरू होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात पडदे के पिछे क्या है? ऽ   पडदे के पिछे . . ऽ ऽ. असा संभ्रम निर्माण व्हायला जागा मिळाली आणि उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.! आता पुन्हा शिवसेना भाजप एकत्र येणार आणि हम बने तुम बने ‘एक दुजे के लिये’ सिनेमा पहयला मिळणार की काय? अश्या शंका सुध्दा लोक व्यक्त करू लागले. मात्र राहूला बाबा आणि अदित्य बाबा यांनी दोघांनी गळाभेट घेत भारत जोडो यात्रेत एकत्र हातात हात घालून चालत मिले सूर मेरा तुम्हारा. .  तो सूर बने हमारा म्हणताना पाहीले आणि बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि इंदिराजींचा नातू आता देशाला नव्या नेतृत्वाची ‘दिशा’ दाखविणार अशी ‘आशा’ मनात प्रज्वलीत झाली. ‘नफरत छोडो भारत जोडो’ म्हणत राहूल आणि आदित्य एकत्र चालले त्यापूर्वी आदल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि राहूल गांधी(Rahul Gandhi) यांनी एकत्र चालत ‘हम साथ साथ है’ चा प्रत्यय दिलाच होता! त्यामुळे मग राऊत साहेबांच्या त्या वक्तव्यांवर समाधान करून घ्यावे लागले! असो.

Devendra-Fadnavis

मात्र तोच दुसरीकडे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्वा सावरकारांचा वारंवार अवमान करणा-या राहूल गांधी सोबत आदित्य ठाकरे चालतात तर त्यांचे हिदुंत्व आणि सावरकरांबद्लचे विचार नेमके कोणते आहेत याचा खुलासा उध्दवजीनी केला पाहीजे असा सवाल केला. त्याचवेळी एका आंग्ल/ हिंदी वाहिनीच्या कार्यक्रमात व्यासपिठावरून राज्यात झालेले सत्तांतरचे नाट्य हे ‘बदलाचे राजकारण’ नाही तर ‘बदल्याचे राजकारण’ होते असा मोठ्ठा गौप्यस्फोटही फडणवीस यानी केला! माझ्याशी उध्दव ठाकरे २०१९ मध्ये जसे वागले त्याचा बदला मी संधी मिळताच घेतला म्हणत शिंदे यांच्या बंडाला हातभार लावला असा कबुलीनामाच फडणवीस साहेबांनी जाहीरपणे देवून टाकला! त्यावर २५० वर्षानंतर राज्यात पुन्हा शिंदे – फडणवीस या जोडगोळीचे (महादजी शिंदे आणि नाना फडणवीस प्रमाणे) राज्य किंवा ईडी (एकनाथ – देवेंद्र) सरकार अस्तित्वात आले असे तर देवेंद्रजीना म्हणायचे नसावे मा असा ऐतिहासिक संदर्भ उगाच मनात येत राहिला.! तर संजय राऊत यांना लोकप्रतिनीधी म्हणून वेळ हवा असेल तर भेटण्याची वेळ दिली जाईल असे सांगतानाच राजकारणाची ‘कटुता कमी करण्यासाठी मी एकट्याने काही करुन ती कमी होणार नाही’ त्यासाठी ‘सर्वाचा सहभाग असायला हवा’ असे सांगायलाही देवेंद्रजी विसरले नाहीत. असो.

तर अशी सकारात्मक घडामोडींची मालिका सुरू होतानाच ‘हर हर महादेव’ करत मनसेच्या अध्यक्षांच्या आवाजाच्या (व्हाईसोवर) साक्षीने ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सिनेमा रिलीज झाला. राज्यात या चित्रपटाच्या मोफत खेळांची व्यवस्था करण्याची मनसे घाई सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवरा यानी अधीरपणे व्यक्त केल्याचे समजले आणि. . . .  ‘महाराज घात झाला!’  ज्या सिनेमाची राज्यातील थोरापोरांना शासकीय पाठिंब्याने सर्वदूर प्रदर्शनाची तयारी सुरू केली त्याच सिनेमात महाराजाच्या चुकीच्या इतिहासाचा मुद्दा खुद्द छत्रपतींच्या वंशजानी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यानी उपस्थित केला, त्यावर संभाजी ब्रिगेडने पुण्यात चित्रपटाचे खेळ थांबवत त्यावर बंदीची मागणीही केली. त्यानतर ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुढाकार घेत ‘महाराजांचा अवमान सहन करणार नाही’ म्हणत तलवार परजली! त्यात मनसेने उडी घेत सिनेमागृहात खेळ होतील असे पाहिले. मात्र ठाण्यात आव्हाड यांचे अटक आणि जामिन नाट्य दोन दिवस सुरू राहिले. नेमके त्याच वेळी अनेक वर्षापासून प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीजवळच्या अतिक्रमणांवर राज्य सरकारने कारवाई केली. अनेक दशकांपासून येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती. ती उध्वस्त करतानाच ‘हिंदुत्वाच्या रक्षकाची’ भुमिका बजावत राज्य सरकारने पुढाकार घेतला. आणि पुन्हा राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यानी छत्रपतींची जगदंबा (भवानी नव्हे) ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मार्फत राज्यात परत आणायचा प्रयत्न सुरू केल्याची घोषणा केली. त्यासाठीच सांगली येथे परमपुज्य संभाजी भिडे गुरूजी यांनी पंतप्रधान सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्ती यांची आग्रहपूर्वक भेट घेतल्याची माहिती देखील अनेकांच्या वाचनात आली असेल. तर अश्या एका पेक्षा एक सकारात्मक घडामोडींचा हा आठवडा ‘इतिहास रक्षकाच्या ’ भुमिकेतील राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांना देखील न्यायालयातून जामिन मिळाल्याच्या बातमीने संपन्न झाला.

‘आपल्याला विनाकारण अटक केली, त्यासाठी सरकारच्या चाणक्यांनी पोलीसांवर दबाव आणला’ असे आव्हाड म्हणाले आणि ते म्हणत आहेत तोवर त्यांच्यावर कारवाई करणा-या डिसीपी राठोड यांची बदली सुध्दा झाली! तर असा हा सकारात्मक घडामोडींचा सप्ताह त्यामुळे खूपच सकारात्मक वाटू लागला नाही तरच नवल नाही का? त्यातील वेगवेगळ्या घटनाचा तसा दूरान्वये संबध नसल्याचे वाटले तरी अन्योक्तीने ‘हातात घालूनी हात चालूया वाट’ म्हणत या सा-या घडामोडी घडत गेल्या की काय? असे उगाचच वाटत राहते. कदाचित हा भारत जोडो यांत्रेचा मानसिक प्रभाव (सायकोलॉजीकल इम्पँक्ट)(Psychological Impact) असेल असे सकारात्मकपणे समजायला तरी काय हरकत आहे!? नफरत छोडो भारत जोडो! बी पॉझीटिव्ह!

के शु भाई


मंकी बात

 

 

मंकी बात…

Social Media