शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशीच्या वाढदिवशी बाळासाहेबांशी निष्ठा कायम !  ठाकरेंची साथ सोडणार नाही.

मुंबई  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी जुलै महिन्यात भेट घेवून सोबत येण्याची विनंती केल्यानंतर लिलाधर डाके यांच्या प्रमाणेच शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री  मनोहर जोशी(( Manohar Joshi) यांनी आपल्या निष्ठा शेवटपर्यत बाळासाहेब  ठाकरेसोबत असल्याचा निर्वाळा देत ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण  दिले होते.  वाढ दिवशी आज पुन्हा याच भुमिकेवर कायम असल्याचे जोशीसरांनी म्हटले आहे.

त्यानी म्हटले आहे की मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेत आहे, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने उभा आहे. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी  वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी संवाद साधताना मनोहर जोशी  म्हणाले की माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकलो याचे समाधान असल्याचेही जोशी  म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात जोशी याना निमंत्रण  असल्याच्या चर्चांना त्यामुळे पूर्णविराम  मिळाला आहे. जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या दादर परिसरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी जोशी कुटुंबीयांकडून एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्याशी काही वेळ गप्पा मारल्या होत्या.

Social Media